गांधी हे यंत्र विरोधी नव्‍हते-प्रा. श्रीराम जाधव यांचे प्रतिपादन

औरंगाबाद,१७ ऑगस्ट /प्रतिनिधी :-सर्वात चांगले जीवन शेतकऱ्यांचे आहे कारण ते कष्टाचे आहे. गांधी हे यंत्र विरोधी नव्हते. यंत्राचे मानवावर नव्हे, तर मानवाचे यंत्रावर नियंत्रण असले पाहिजे. गांधीजी़ंवर रस्किनच्या विचारांचा प्रभाव होता म्हणुन ते म्हणत असत की सर्वांचे भले झाले तर माझे भले होईल. असे प्रतिपादन देवगिरी महाविद्यालयाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी ‘ग्राम स्वराज्य आणि शेती विषयी महात्मा गाँधी यांचे विचार’ या विषयावर बोलतांना केले.

गंगापुर येथील मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री मुक्तानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे आयोजित आजादी का अमृत महोत्सव भारत@75 निमित्ताने आयोजित व्याख्यानात ते बोलते होते. तर बामु विदृया पीठातील प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. राम चव्‍हाण यांनी विद्यार्थ्यांना वर्गातून आणि वर्गाबाहेर जाऊन त्यांच्या जन्मजात गुणांना वाव देऊन त्यांच्यात दडलेला प्रतिभेचा राजहंस शोधून सामाजिक जवाबदारीच्या जाणिवेतून विद्यार्थ्‍यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणला पाहिजे असे सांगितले.

दोन दिवसाच्या व्याख्यानाच्या अध्यक्ष स्थानी क्रमशः केन्द्रीय कार्यकारिणी सदस्य लक्ष्मणराव मनाल व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. मधुसूदन सरनाईक होते. शेती विषयी बाबींचा ऊहापोह होत असतांना सर्व समाज घटकांनी याचा विचार केला पाहिजे. शेती भावाला हमीभाव व, शेतकऱ्याला व्यवस्थापनाची किंमत दिली तर शेती हा व्यवसाय उत्कृष्ट होईल. डॉ चव्हाणांनी दर्शविलेल्या चित्रांमधून आणि त्यांच्या अमूल्य व्याख्यानातून विद्यार्था्याचा व्यक्तिमत्व विकास होऊन तो समाजाच्या विकासात योगदान देईल असे प्राचार्य डॉ मधुसूदन सरनाईक यांनी या प्रसंगी सांगीतले.

या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अर्चना मंटाले व डॉ. भगवान मनाल यांनी केले. सूत्र संचालन डॉ. भगवान मनाल व डॉ मीना खरात तसेच आभार डॉ. अतुल केचे  यांनी मानले. या कार्यक्रमात उप प्राचार्य डॉ. वैशाली बागुल , उप प्राचार्य डॉ. बी. टी. पवार, उप प्राचार्य विशाल साबणे, पर्यवेक्षक सातपुते आणि प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.