महावितरणमध्ये गुणवंत तांत्रिक कामगारांचा गौरव

औरंगाबाद १६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- महावितरणच्या औरंगाबाद परिमंडल कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या 32 तंत्रज्ञ व 7 यंत्रचालकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डाॅ.अजय उकडगावकर यांनी आणीबाणीच्या प्रसंगी अत्यवस्थ व्यक्तीस ‘सीपीआर’ उपचार कसा द्यावा, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. गुणवंत तांत्रिक कर्मचारी पुरस्कार सोहळा कोविड नियमांचे पालन करून परिमंडल कार्यालयात पार पडला. यावेळी कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. मुख्य अभियंता भुजंग खंदारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अधीक्षक अभियंता संजय सरग, मोहन काळोगे, सतीश खाकसे, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, उपमुख्य औद्योगिक संबंध‍ अधिकारी विश्वास पाटील, डॉ.अजय उकडगावकर, डॉ.यादव, कामगार विभागाचे अधिकारी अरविंद तेलवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात 39 कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कामगार म्हणून गौरवण्यात आले. मेडिकव्हर रुग्णालयाच्या वतीने सर्व गुणवंत कामगारांना भेटवस्तू देण्यात आली. तसेच सर्व उपकेंद्रांना रुग्णालयाच्या वतीने प्रथमोपचार पेटीही भेट देण्यात आली. तसेच रुग्णालयाच्या वतीने महावितरण कर्मचाऱ्यांसाठी विविध तपासण्यांमध्ये सवलत देणाऱ्या गिफ्ट कार्डचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मुख्य अभियंता भुजंग खंदारे म्हणाले की, कोरोना काळात ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. पुरस्कार म्हणजे चांगल्या कामाची पावती असते. इतर कर्मचाऱ्यांनीही पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगात कुटुुंबप्रमुख म्हणून तुमच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गुणवंत कर्मचाऱ्यांच्या वतीने लक्ष्मण राठोड, रमेश‍ शिंदे, नाना जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध‍ अधिकारी विश्वास पाटील यांनी केले. याप्रसंगी सहायक महाव्यवस्थापक चेतन वाघ, कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, महेश पाटील, कनिष्ठ विधी अधिकारी सुनील पावडे, व्यवस्थापक अशोक पेरकर, वीज कामगार महासंघाचे परिमंडल सचिव वाल्मिक निकम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपव्यवस्थापक संजय खाडे, प्रकाश जगताप, किशोर वाघ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला.

पुरस्कारप्राप्त कर्मचारी पुढीलप्रमाणे : औरंगाबाद शहर मंडल  लक्ष्मण राठोडविश्वनाथ गोलेशहा फकिर फुरकान निशादयोगेश गरूडलक्ष्मण‍ भुईगळकृष्णा तांबेसपना मुक्कावारसचिन चाबूकस्वारशरद पाचोडेगोरखनाथ हिवाळेऔरंगाबाद ग्रामीण मंडल – रमेश शिंदे,‍ अनिल बोंगाणे, विजय साळवे, शिवनाथ घाटे, नितीन सूर्यवंशी, प्रशांत जगताप, सुधाकर नागरे, संदीप कोलते, श्रीरंग राठोड, राजेंद्र सोनवणे, प्रवीण जाधव, मनोज गवळी, दीपक काळे, सुभान अब्दुल रहमान तडवी, दिवाकर झाडे, विनोद गव्हाणे, विजय चौधरी. जालना मंडल –पांडुरंग ठाकरे, सुनील घोरबांड, समाधान उकांडे, निवृत्ती‍ चिकटे, बिभीषण शेळके, नाना जाधव, पंढरीनाथ बंगाळे, संतोष हुसे, बळीराम पवार, राजेंद्र मखमले, भरत नळगे, विशाल बावणे.