भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 51.90 कोटी पेक्षा जास्त

गेल्या 24 तासात 41 लाखाहून अधिक मात्रा

भारताने रुग्ण बरे होण्याचा आतापर्यंतचा 97.45% हा सर्वोच्च दर गाठला

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 38,353 नवे दैनंदिन रुग्ण

नवी दिल्ली ,११ ऑगस्ट /प्रतिनिधी :- भारतात  कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण 51.90  कोटींहून अधिक झाले आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 59,57,616 सत्रांद्वारे  51,90,80,524 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 41,38,646 मात्रा देण्यात आल्या.

21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

कोरोनातून बरे होण्याचा दर गेल्या 24 तासात 97.45% झाला असून महामारीची सुरवात झाल्यापासूनचा भारताने गाठलेला हा सर्वोच्च दर आहे.

महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,12,20,981 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 40,013 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

गेल्या 24 तासात 38,353 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

सलग 45 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,86,351असून 140 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.21% आहेत.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ करत देशात गेल्या 24 तासात 17,77,962 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 48.50 कोटीहून अधिक (48,50,56,507) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.34% आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर आज 2.16% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 16  दिवस 3% पेक्षा कमी तर सलग 65 दिवस  5% पेक्षा कमी आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 53.24 कोटींपेक्षा अधिक मात्रा पुरवण्यात आल्या

कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरणाची देशभरात व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसींची अधिक उपलब्धता,  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेवर आधीच  दृष्टीक्षेप आणि प्रवाही लस पुरवठा साखळी याद्वारे लसीकरण अभियानाला अधिक गती देण्यात आली आहे.


देशव्यापी लसीकरण अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा पुरवत आहे. कोविड-19 लसीकरण अभियानाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्यात केंद्र सरकार, देशातल्या लस उत्पादकांकडून उत्पादित 75% लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवणार आहे.

केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे  53.24 कोटींपेक्षा जास्त (53,24,44,960) लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत.आणखी 72,40,250 मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत.


आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार,
वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 51,56,11,035 मात्रा देण्यात आल्या आहेत.

याशिवाय लसीच्या 2.25 कोटी पेक्षा जास्त (2,25,03,900) शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.