शाळेची घंटा 17 ऑगस्टपासून वाजणार

ग्रामीण आणि शहरी भागात वर्ग सुरू होणार

ग्रामीण भागात 5 ते 8 वी आणि शहरी भागात 8 ते 12 वी शाळा सुरू केल्या जाणार आहे

मुंबई,१० ऑगस्ट /प्रतिनिधी :- राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचे परिपत्रक अखेर जारी करण्यात आले आहे. टास्क फोर्सच्या विरोधानंतरही शाळा सुरू करण्याची नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे हे विशेष. यात ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर शहरी भागातील 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करण्यास परवानगी आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे शहरातील शाळा सुरू करण्याबाबत महापालिका आयुक्तांना अधिकार देण्यात आले आहेत.

कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व दुकानं आणि बाजारपेठा सुरू झाल्या आहे. गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुद्धा आता 17 तारखेपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात आली असल्याने तिथली परिस्थिती देखील सुधारत आहे, अशा ठिकाणी काही प्रमाणात शाळा सुरू कराव्यात असा विचार शालेय शिक्षण विभागाने व्यक्त केला. त्यानंतर आता ग्रामीण आणि शहरी भागात 17 तारखेपासून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात 5 ते 8 वी आणि  शहरी भागात 8 ते 12 वी शाळा सुरू केल्या जाणार आहे. सांगली सातारा, कोल्हापूर , रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बीड, उस्मानाबाद पुणे, अहमदनगर यासारख्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी निर्णय घ्यावा लागणार आहे.

हे आहेत निर्बंध 

शाळेत जर एखाद्या विद्यार्थ्यांना कोविडची लागण झाल्यास आढळल्यास तात्काळ शाळा बंद करण्यात येणार आहे.

शाळा सुरू करताना कोविड नियंत्रण उपाय योजना करणे, विद्यार्थींना हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था करणे, शाळेच्या शिक्षकांनी लसीकरण पूर्ण करणे, शिक्षकांनी शाळा असलेल्या गावात राहावे, अथवा ये जा करण्यासाठी सार्वजनिक वाहनाचा वापर करू नये, असे नियमही घालून दिले आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळला नसावा, शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले असावे, जर ते केले नसेल तर पहिल्यांदा लसीकरण करावे विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी काढण्यासाठी शाळा परिसरात येऊन देऊ नये. विद्यार्थी बाधित झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करावी आणि शाळा निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी, विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.