सामाजिक अंतर न राखणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

दिवसभरात 45 हजार 400 रुपयांचा दंड वसुल

जालना,दि. 19 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत असुन दि. 19 जुन, 2020 रोजी 152 व्यक्तींवर कारवाई करत 45 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी, नगर परिषद, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जालना शहरामध्ये सामाजिक अंतर न राखणाऱ्या 109 व्यक्तींकडून 21 हजार 900 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 43 व्यक्तींकडून 21 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. त्याचबरोबर फुलबाजार ते सदरबाजार पोलीस स्टेशन येथील नालीच्या बाहेर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यासाठी मोहिम राबविण्यात आली असुन या मोहिमेमध्ये 150 दुकानाचे अतिक्रमण काढून घेण्याबराबरच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हातगाडीवर भाजीपाला व फळविक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल,जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश जारी
Image may contain: 1 person

जालना, दि. 19 – संपुर्ण देशात कोरोना विषाणंचा प्रादुर्भाव झालेला असुन महाराष्ट्र राज्यात देशातील एकुण रुग्णापैकी सर्वाधिक रुग्ण आढळुन आले आहेत .त्याचा परीणाम म्हणुन जालना शहरात अनेक कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले आहे. शहरातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोरोना ग्रस्त रुग्ण आढळलेला जालना शहरातील काही भाग सिलबंद करण्यात आला आहे.तरी या भागातुन पुढे जाणारे वाहतूकीस अडथळा निर्मीण होणार नाही यासाठी मुंबई पोलीस कायदयाचे कलम 33 (1) सह कलम 36 अन्वये प्रदान केलेल्या शक्तीनुसार एस .चैतन्य, पोलीस अधिक्षक जालना यांनी जालना शहरातील सध्या प्रचलीत मार्गवरील जाणारी व येणारी वाहतूक दि.20 जुन 2020 रोजी 06.00 वाजेपासुन पुढील आदेशापर्यत खालील नमुद पर्याय मार्गाने वळविण्याचे आदेश पारीत केले आहेत.

सध्याचा प्रचलित मार्ग :- पाणीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा

पर्यायी मार्ग :- पाणीवेस-महावीर चौक–मामाचौक-फुलबाजार पाणीवेस-महावीर चौक-मामाचौक-मुर्गीतलाव पाणीवेस ते राजमहल टॉकीज ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *