कोविड प्रतिबंधक लसीकरणात भारताने एकूण 50.68 कोटींचा टप्पा केला पार

गेल्या 24 तासांत लसीकरणाच्या जवळपास 56 लाख मात्रा

ध्याचा रोगमुक्तीचा दर 97.39 %

गेल्या 24 तासात 39,070 दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद

नवी दिल्ली,८ऑगस्ट /प्रतिनिधी :-भारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 50.68 कोटींचा  (50,68,10,492) महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, आतापर्यंत 58,51,292  सत्रांद्वारे कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 55,91,657 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात लसीच्या 60,15,842 मात्रा देण्यात आल्या.

कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्प्याला देशामध्ये 21 जून 2021 पासून प्रारंभ झाला. संपूर्ण देशभरात लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे आणि त्याची व्याप्ती विस्तारित करणे यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

देशात महामारीच्या प्रारंभीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी  3,10,99,771 व्यक्ती यापूर्वीच कोविड- 19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. आणि गेल्या 24 तासात 43,910  रुग्ण कोविडमधून बरे झाले. यामुळे एकूण रोगमुक्ती दर आता 97.39 % इतका झाला आहे.

गेल्या 24 तासात भारतात 39,070 दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

रोज नोंद होत असलेल्या नवीन कोविड बाधित रुग्णांची संख्या गेले सलग 42 दिवस 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या अखंडित आणि संयुक्तपणे करण्यात आलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,06,822 इतकी आहे आणि देशातील सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.27 % इतके आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासात देशात एकूण 17,22,221 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या अगदी सुरवातीपासून आतापर्यंत देशात 48 कोटींहून अधिक (48,88,39,185) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात एका बाजूला चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.27 % आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गेले 13 दिवस 3 % पेक्षा कमी आहे आणि सलग 62 दिवस 5% पेक्षा कमी राहिला आहे.