हॉकीसारख्या पारंपरिक भारतीय खेळाला गतवैभव मिळवून देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

भारतीय खेळांना प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारे आणि उद्योग जगताला केले आवाहन

नवी दिल्ली,७ऑगस्ट /प्रतिनिधी :- हॉकीसारख्या पारंपरिक भारतीय खेळाला गतवैभव मिळवून देण्याचे आवाहन आज उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. राज्य सरकारे आणि उद्योग जगताने पुढे येत भारतीय खेळांना आवश्यक ते  प्रोत्साहन द्यावे असेही ते म्हणाले.  

Image

दिवंगत समाजसेवक आणि राष्ट्रवादी नेते  श्री चमनलालजी यांच्या स्मरणार्थ उपराष्ट्रपती निवासात त्यांनी आज टपाल तिकीटाचे  प्रकाशन केले. टोकियो ऑलिंपिकमधील भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीने खेळांमधली रुची पुन्हा जिवंत केली आहे. हॉकी, कबड्डी यासारख्या पारंपरिक भारतीय खेळांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले. यासाठी प्राथमिक स्तरापासून, कृत्रिम हिरवळ (टर्फ), प्रशिक्षण आणि मार्गदर्शन यासह पायाभूत सुविधा अधिक सक्षम करायला हव्यात असे ते म्हणाले. केन्द्र सरकार भारतीय खेळांना देत असलेल्या प्रोत्साहनाची श्री नायडू यांनी प्रशंसा केली.