महिला हॉकीमध्ये आपले पदक थोडक्यात हुकले मात्र या संघात नव भारताचे चैतन्य प्रतिबिंबित- पंतप्रधान

नवी दिल्ली ,६ऑगस्ट /प्रतिनिधी :- महिला हॉकीमध्ये आपले पदक थोडक्यात हुकले मात्र या संघात नव भारताचे चैतन्य प्रतिबिंबित होत आहे जिथे आपण आपली सर्वोत्तम कामगिरी करत नवी उंची गाठतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. टोक्यो ऑलिम्पिक 2020 मधली आपल्या महिला हॉकी संघाची शानदार कामगिरी आपल्या सदैव स्मरणात राहील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

News Details



‘टोक्यो ऑलिम्पिक 2020 मधली आपल्या महिला हॉकी संघाची शानदार कामगिरी आपल्या सदैव स्मरणात राहील. त्यांनी त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली. संघातल्या प्रत्येक खेळाडूने साहस, कौशल्य आणि चिकाटीचे दर्शन घडवले. उत्तम कामगिरी करणाऱ्या या असामान्य संघाचा भारताला अभिमान आहे,’ असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.

महिला हॉकीमध्ये आपले पदक थोडक्यात हुकले मात्र या संघात नव भारताचे चैतन्य प्रतिबिंबित होत आहे जिथे आपण आपली सर्वोत्तम कामगिरी करत नवी उंची गाठतो. सर्वात महत्वाचे म्हणजे #टोक्यो ऑलिम्पिक 2020 मधले  या संघाचे यश भारताच्या युवा कन्यांना हॉकीकडे वळण्यासाठी आणि उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरित करेल. या संघाचा अभिमान आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

OG 2020 (Women) Bronze Medal Match: IND vs GBR