देशात रुग्ण बरे होण्याचा दर 52.96% पर्यंत वाढला

नवी दिल्‍ली, 18 जून 2020
कोविड-19 ची चाचणी सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी म्हणून तयार करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या फिरत्या आय-लॅबचे (संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा) उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले. देशातील दुर्गम, अंतर्गत आणि सुलभ दळणवळणाचे मार्ग नसलेल्या भागात ही प्रयोगशाळा तैनात केली जाईल आणि प्रति दिन 25 कोविड-19 आरटी-पीसीआर चाचण्या, दररोज 300 एलिसा चाचण्या, क्षयरोग, एचआयव्ही इत्यादींसाठी अतिरिक्त चाचण्या घेण्याची तिची क्षमता आहे. कोविड नियंत्रण धोरणाअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने ही संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 7390 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,94,324 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 52.96% पर्यंत वाढला आहे. सध्या 1,60,384 संक्रमित रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

शासकीय प्रयोगशाळांची संख्या 699 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 254 पर्यंत वाढली आहे (एकूण 953 प्रयोगशाळा). वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 540 (शासकीय: 349 + खाजगी: 191)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 340 (शासकीय: 325 + खाजगी: 15)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 73 (शासकीय: 25 + खाजगी: 48)

गेल्या 24 तासात 1,65,412 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत  62,49,668 नमुने तपासण्यात आले.

इतरअपडेट्स:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *