सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये आता पर्यंत 37 जणांचा मृत्यु

भूस्खलनामुळे 26, छत पडून 1, दरड कोसळून 2 तर 8 जणांचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु

बेपत्ता, भूस्खलन व पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांचे शोध घेण्याचे काम सुरु

सातारा,२६जुलै /प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील भूस्खलनामुळे 26 जण, छत पडून 1 जण, 2 जण दरड कोसळल्यामुळे तर 8 जणांचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे असे एकूण 37 जणांचा दुर्दैवीपणे मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

May be an image of one or more people, people standing, tree and outdoors

वाई तालुक्यातील 3 जण, जावली तालुक्यातील 4 जण, पाटण तालुक्यातील 27 जण, सातारा तालुक्यातील 2 जण, तर महाबळेश्वर तालुक्यातील 1 जणांचा मृत्यु झाला आहे. वाई तालुक्यातील कोंढावळे येथील 2 महिलांचा भूस्खलनामुळे तर एका पुरुषाचा छत पडून मृत्यु झाला आहे. जावली तालुक्यातील रेंगडी येथील 2 महिला व वाटंबे येथील एका पुरुषाचा तर मेढा येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे.

May be an image of 1 person, standing, tree and outdoors

पाटण तालुक्यातील बोंद्री येथील एक पुरुष, जळव येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे. मंद्रुळकोळे येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यु झाला आहे. आंबेघर तर्फ मरळी येथील 5 पुरुष व 6 महिलांचा तर काहीर येथील एका महिलेचा भूस्खलनामुळे मृत्यु झाला आहे. रिसवड येथील 2 पुरुष व 2 महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यु झाला आहे. मिरगाव येथील 4 पुरुष व 4 महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यु झाला आहे. सातारा तालुक्यातील कुस बु येथील एका महिलेचा व कोंडवे येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने  मृत्यु झाला आहे.

May be an image of 1 person, standing, outdoors and tree

पाटण तालुक्यातील भुस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचे शोध व बचाव काम सुरु असून अद्यापही अंदाजित एकूण 5 नागरिक बेपत्ता असून जावली व वाई तालुक्यातील प्रत्येकी 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले असून त्यांचा शोध घेण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.