कोरोनाच्या सावटामध्ये क्रीडा महाकुंभाला सुरूवात

टोकयो :संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेली टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेला  सुरूवात झाली आहे. टोकयोतील नॅशनल स्टेडियममध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम सुरू झाला. टोकयोमध्ये 1964 नंतर दुसऱ्यांदा ऑलिम्पिक होत आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचं मोठं सावट आहे. कोरोनामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलावी लागली. 

ऑलिम्पिक उद्घाटन कार्यक्रम हा स्पर्धेच्या आकर्षणाचा मुख्य बिंदू असतो. यंदा कोरोनामुळे फक्त 1000 खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम स्टेडियममध्ये पाहण्याची प्रेक्षकांना परवानगी नाही. मात्र जगभरातील 350 कोटी लोकं टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल तसंच वेगवेगळ्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहात आहेत, असा दावा ऑलिम्पिक आयोजन समितीनं केला आहे.

जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. करोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी तहकूब करण्यात आल्या. पण एका वर्षानंतर या स्पर्धा खेळल्या जात आहेत. आज या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा अतिशय दिमाखात रंगला. टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी २१ व्या क्रमांकावर उतरली. यात २२ खेळाडू आणि ६ अधिकारी सहभागी झाले. या मार्चपास्टमध्ये ग्रीकचा पहिला क्रमांक होता.यामध्ये भारतीय पथकाचा क्रमांक  21 वा होता. भारतीय पुरुष हॉकी टीमचा कॅप्टन मनप्रीत सिंह आणि ऑलिम्पिक मेडल विजेती बॉक्सर मेरी कोम यांना या कार्यक्रमात ध्वज वाहकाचा मान मिळाला.

भारतीय ऑलिम्पिक पथकात यंदा 124 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 69 पुरुष तर 55 महिला आहेत. एकूण 85 गोल्ड मेडलसाठी भारतीय खेळाडू त्यांची दावेदारी या स्पर्धेत सादर करणार आहेत.

पंतप्रधानांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंच्या पथकाला  शुभेच्छा दिल्या

Banner

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 साठी भारतीय खेळाडूंच्या पथकाला  शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“चला,  आपण सर्वजण  #Cheer4India म्हणूया.

@ Tokyo2020 उदघाटन सोहळ्याची थोडी  झलक पाहिली.

आपल्या उत्साही चमूला  हार्दिक शुभेच्छा. # Tokyo2020″

करोनामुळे ऑलिम्पिकमध्ये बरेच मोठे बदल 

करोनामुळे ऑलिम्पिकमध्ये बरेच मोठे बदल पाहायला मिळतील. खेळाडूंना या विषाणूच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी एक अतिशय कठोर बायो बबल तयार केला गेला आहे. टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांशिवाय रंगणार आहे. करोनाच्या महामारीमुळे खेळाडूंना दररोज १९ चाचणींमधून जावे लागेल. या चाचणीच्या अहवालाशिवाय कोणत्याही खेळाडूला मैदानावर प्रवेश मिळणार नाही. इतकेच नव्हे, तर एखाद्या खेळाडूने अंतिम फेरी गाठली असेल आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर त्याला पदकाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागेल.