श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

औरंगाबाद ,२३ जुलै /प्रतिनिधी :-​ श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष प्रा. सुहास पानसे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थिनींचा अभाव असतानाही ही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षीय समारोप करताना ते म्हणाले विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य हे दिव्यत्वाची प्रचीती देणारे आहे म्हणून शिक्षक होणे हे भाग्याचे लक्षण आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या शालेय समिती सदस्य साधना शाह होत्या, शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या गुरू शिष्याचे नाते अतूट आहे ज्यामुळे शिष्याचे व्यक्तिमत्व गुरूंच्या सान्निध्यात विकसित होते.

या कार्यक्रमात 2020-21 कोरोना महामारी च्या कालखंडात कोरोना योद्धे म्हणून कार्य करणाऱ्या प्रशालेतील अनुक्रमे अनुराधा पांडे, संगीता रोंघे, वैशाली देशपांडे, सुनिता चौधरी, सुनिता जाधव, मनीषा हजारे, पुनम नवले, तंत्रस्नेही  शिक्षिका संजीवनी लहासे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता मुळे, उपमुख्याध्यापिका वंदना रसाळ, दोन्ही विभागाच्या पर्यवेक्षिका अलका भंगाळे, शोभा बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.            

कोविड-19 च्या सर्व नियमावलीचे पालन करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती पुंड, पुनम नवले, अलका कलकोटे, सविता पवार, हेमलता पवार, वैशाली धामणगावकर, अश्विनी भोसले या शिक्षकांनी परिश्रम घेतले.