मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

मुंबई, दि.२०:-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट रोखण्यासाठी हा सण घरीच राहून साजरा करा, यातून आपले कुटुंबीय आणि परस्परांची काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे.

‘ईद-उल-अजहा’ त्याग, समर्पणाचा संदेश देणारा आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्परांविषयी आदर बाळगूया,’ असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शांती आणि त्यागाचे प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सौहार्द वाढीस लागो, यंदाची बकरी ईद राज्यावरचं कोरोना संकट दूर करणारी ठरो, अशा शुभेच्छा देतानाच उपमुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाचं संकट संपल्यानंतर ‘बकरी ईद’सह सर्व सण पूर्वीप्रमाणे उत्साहात, आनंदात, सर्वांना सोबत घेऊन साजरे करु शकू, असा विश्वासदेखील उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.