लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांनी पुणे येथे त्रिनेत्र ब्रिगेड आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला दिली भेट

पुणे,१९जुलै /प्रतिनिधी :-

लेफ्टनंट जनरल जेएस नैन, जीओसी-इन-सी, सदर्न कमांड यांनी त्रिनेत्र ब्रिगेडच्या कार्य सज्जतेचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान, त्रिनेत्र ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर राजेश वर्मा यांनी आर्मी कमांडरांना  इलेक्ट्रो मॅग्नेटिक डोमेनमधील उदयोन्मुख आव्हानांचा सामना करण्यासाठी हाती घेतलेल्या विविध परिचालन, प्रशिक्षण आणि प्रशासकीय उपक्रमांची माहिती दिली.आर्मी कमांडर यांनी युद्धाच्या बदलत्या स्वरूपावर  भर दिला आणि स्पष्ट केले की समन्वित माहिती मोहिमा ही भविष्यातील रणांगणातील युद्धनीती आहे.

नंतर त्यांनी पुणे येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (एएसआय) येथे भेट दिली. तेथे कर्नल राकेश यादव, कमांडंट एएसआय यांनी प्रशिक्षण पद्धती व त्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली. आर्मी कमांडंर यांनी  देशातील क्रीडा क्षेत्राच्या भविष्याबाबत विश्वास व्यक्त केला आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या मिशन ऑलिम्पिक संघाला  शुभेच्छा दिल्या.