औरंगाबाद जिल्ह्यात 47 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 255 कोरोनामुक्त, 289 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,१९जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 35जणांना (मनपा 9, ग्रामीण 26) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 255 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 47 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 19 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 475 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 289 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (17) दशमेश नगर 1, डीपीएस संकुल 1, गारखेडा परिसर 3, कडा भवन 1,शिवाजी नगर 1, सातारा परिसर 2, ज्योती नगर 1, मुकुंदवाडी 1, अन्य 6 

ग्रामीण (30) गंगापूर 10, कन्नड 2, सिल्लोड 2, वैजापूर 13, पैठण 3 
मृत्यू (02)

घाटी (01) 1.     59,पुरुष, कबाडीपुरा

खासगी (01) 1.     70, पुरुष, फुलंब्री

जिल्ह्यातील  1025950 जणांचे कोविड लसीकरण
औरंगाबाद जिल्ह्यात दि.19 जुलै 2021 पर्यंत एकूण 1025950 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची  एकूण संख्या ) जणांचे  कोविड लसीकरण झाले असून दि. 19 जुलै रोजी  एकूण 14781  जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 11371 जणांनी तर शहरात 3410 जणांनी लस घेतली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.     

दि. 19 जुलै 2021 पर्यंत  ग्रामीणमध्ये  387278 जणांनी पहिला डोस घेतला तर 111725 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये  एकुण 499003 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये  384766 जणांनी पहिला डोस घेतला तर 142181 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण  526947 जणांचे लसीकरण झाले आहे.