पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान लोकसभेत विरोधी पक्षाकडून जोरदार गदारोळ

नवी दिल्ली ,१९जुलै/प्रतिनिधी :- पहिल्याच दिवशी लोकसभेत भाषण करायला उठताच विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला. काँग्रेस खासदारांनी लोकसभेत महागाईचा मुद्दा लावून धरला. यावेळी जोरदार हंगामा केला. मोदींच्या भाषणादरम्यान संसदेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महागाईच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत.काँग्रेससोबत अकाली आणि बसपाचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर आक्रमक झालेत. लोकसभा व राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ चालूच ठेवल्याने कामकाज स्थगित करण्यात आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांची ओळख करुन देण्यासाठी उभे राहिले होते. विरोधकांकडून यावेळी गदारोळ घातला जात असल्याने मोदींनी त्यांच्यावर निशाणा साधला. इतक्या महिला, दलित आणि आदिवासींना मंत्री बनवण्यात आल्यानंतर संसदेत उत्साह असेल असं मला वाटलं होतं असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

पंतप्रधान म्हणाले की, मला वाटले की आज उत्साहाचा दिवस असेल परंतु विरोधी पक्ष दलित, महिला आणि ओबीसी लोक मंत्री बनवण्याच्या चर्चा पचवित नाहीत. मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत मंत्रीमंडळाची ओळख करून देत असताना ही टीका केली. हा गोंधळ पाहून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोरोनादरम्यान मृत्यू पावलेल्या खासदारांविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. तसेच विरोधकांच्या गदारोळानंतर बिर्ला यांनी हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला.

 पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतींचा निषेध व्यक्त करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार सायकलवरून संसदेत पोहोचले.  विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणं योग्य नाही असं त्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले.