औरंगाबाद जिल्ह्यात 3036 कोरोनाबाधित ,1709 कोरोनामुक्त

औरंगाबाद, दि. 17 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1709 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1161 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 104 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 3036 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. राजीव नगर (1), समता नगर (2), पेंशनपुरा (1), भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (2), मसून नगर (1), पळशी (2), एन आठ सिडको (5), पुष्प गार्डन (1), गजानन नगर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), सेव्हन हिल (1), हडको (1), एसआरपीएफ कॉलनी (2), जटवाडा रोड (1), बीडबायपास (1), नारेगाव (3), जयभवानी नगर (2),ठाकरे नगर (1), न्यू एसटी कॉलनी, एन दोन सिडको (1), मनजीत नगर (1), एन नऊ सिडको (3), जुनी मुकुंदवाडी,विठ्ठल मंदिर जवळ (2), शंभू नगर, गारखेडा (1), न्यू विशाल नगर (5),ब्रिजवाडी (1), शहानूरवाडी (1), यशोधरा कॉलनी (1), गुलमंडी (1), पद्मपुरा (1), नागेश्वरवाडी (2), उस्मानपुरा (1), शिवशंकर कॉलनी (1), बेरी बाग (1), राजनगर (1), उत्तम नगर (1), जवाहर कॉलनी (1), ज्योती नगर (1), समर्थ नगर (10), सिडको (1) हनुमान नगर (1), सातारा परिसर (1), रमा नगर (2), विश्रांती नगर (3), सिडको वाळूज महानगर दोन (2), बजाज नगर, गुलमोहर कॉलनी (2), शिवाजी नगर (3), न्यू हनुमान नगर (2) गारखेडा (2), मयूर नगर (1), राहुल नगर (1), बजाज नगर (1), संभाजी कॉलनी (1), संजय नगर (1), आयोध्या नगर,‍सिडको (1), मोतीवाला नगर (1), औरंगपुरा (1), अन्य (1) विश्वभारती कॉलनी (1) , रांजणगाव, शेणपूजी (1), चिकलठाणा (1), गौतमी अपार्टमेंट (1), प्रताप नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), बुढीलेन (1), रोशन गेट (1), बायजीपुरा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 40 स्त्री व 64 पुरूष आहेत.

आतापर्यंत 1709 जण कोरोनामुक्तमनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1709 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.घाटीत दोन, खासगीत दोन कोरोनाबाधिताचा मृत्यूशासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 17 जून रोजी मध्यरात्री 12.45 वाजता जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील 60 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद शहरातील बायजीपुरा गल्ली क्रमांक 27 येथील 75 वर्षीय पुरूष रुग्णाचा 17 जून रोजी सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने घाटीत आतापर्यंत 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 121 मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. तसेच शहरातील खासगी रुग्णालयात कटकट गेट येथील 65 वर्षीय स्त्री आणि अन्य एका खासगी दवाखान्यात श्रीराम नगराजवळील विश्वभारती कॉलनीतील 56 वर्षीय स्त्री रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील 121, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 44, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 166 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *