तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी तयारी करावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

औरंगाबाद,१६जुलै / प्रतिनिधी:- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार व प्रतिबंधासाठी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अविरतपणे काम केले आसून ते कौतूकास पात्र आहेत. परंतु आगामी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयायांनी ऑक्सीजन बेडसह, लसीकरण, अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासह विभाग प्रमुखांना आज वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

Displaying IMG-20210716-WA0032.jpg

          यावेळी बैठकीस आमदार कल्याण काळे, विलास औताडे, नामदेव पवार, जितेंद्र देहाडे, रवींद्र काळे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

          बैठकीच्या सुरूवातीला डॉ. कानन येळीकर यांनी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना कालावधीत केलेल्या विविध कामाचा आढावा पीपीटी सादरीकरणाव्दारे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासमोर सादर केला. यामध्ये कोविड तपासणी प्रयोगशाळा, आजवर केलेल्या तपासण्यांची आकडेवारी, ऑक्सीजन निर्मिती व वाढ, कार्यरत मनुष्यबळ याबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे प्रशिक्षण व सक्षमीकरणाबाबत माहिती सादर केली.

          पुढे बैठकीत देशमुख म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित असलेल्या सर्व प्रस्तावांना मान्यता देत असून यामध्ये संरक्षण भिंत बांधकाम, नवजात अर्भक विभागाची निर्मिती, ट्रॉमा केअर सेंटर भाग-2, मॉड्युलर ऑपरेशन थिअटर त्याच प्रमाणे कंत्राटी स्वरूपातील कर्मचारी यांनी सेवेत  सामावून घेण्याबाबतचे प्रस्ताव शासन स्तरावर मांडणार असल्याची  ग्वाही यावेळी श्री. देशमुख यांनी दिली.

           शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने राज्याला दिशादर्शक असे काम करून आरोग्य सेवेचे एक चांगले उदाहरण घालुन दिल्याने मी पुर्ण टिमचे कौतुक करतो. याबरोबरच आरोग्य सेवेविषयी असलेले कोणतेही प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित राहणार नाही. तसेच या प्रस्तावांना जलद गतीने मान्यता देऊन निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही श्री. देशमुख यांनी बैठकीदरम्यान दिली. तसेच आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचारी यांना शासन नियमांच्या अधीन राहुन मदत करण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभाग करीत आहे, असे प्रतिपादन श्री. देशमुख यांनी केले.