मोदी, शाह, नड्डा माझे नेते… धर्मयुद्ध टळावं-पंकजा मुंडे

मी घर सोडणार नाही, दबावतंत्र करायला ही जागा पुरणार नाही – पंकजा मुंडे

पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नाकारले
Image

मुंबई ,१३जुलै /प्रतिनिधी :- पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करत बीड, अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले. राजीनामे दिल्यानंतर आज मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. “माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. त्यामुळे आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत”, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

“मी कुणाला भीत नाही, पण मी आदरही करते. निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. मी माझ्यापेक्षा वयाने मोठं असणाऱ्या व्यक्तींचा अनादर केला नाही. मी निर्भय आहे ते तुमच्याच जीवावर. कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. कोणताही माणूस कोणताही निर्णय घेतो, तो लाभार्थी असतो. मी सगळ्या पक्षांच्या याद्या बघितल्या, तर एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माझ्यासाठी नकोय, तुमच्यासाठी हवंय. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझं ऐका. आपण कष्टाने बनवलेलं घरं का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

Image

पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. मी घर सोडणार नाही, असे सांगताना दबावतंत्र करायला ही जागा पुरणार नाही, स्पष्ट इशारा त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. मला पदाची लालसा नाही. मला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी संपणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी रोखठोक सांगितले.

‘मला सत्तेची लालसा नाही’

पंकजा मुंडे यांनी यावेळी एकदम भावून होत कार्यकर्त्यांना संबोधित केले. ज्यांनी समनार्थ राजीनामे दिले, त्यांचे राजीनामे नामंजूर करत असल्याचे यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्या म्हणाल्या, मी हरले. मला संपविण्याचा प्रयत्न  झाला. मात्र, मी संपणार नाही. कारण तुम्ही आहात. मला सत्तेची लालसा नाही, कुठलीही अपेक्षा नाही. तुमच्या प्रेमाच्या ऋणात मी आहे. जनतेची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. कुठलंही पद मिळण्यासाठी मी राजकारणात आलेली नाही. मला दबाबतंत्र कायरचे असते तर या दबाबतंत्र करायला ही जागा पुरणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.

यावेळी आम्ही नाराज आहेत, असे म्हणत कार्यकर्ते घोषणा देत होते. माझ्या डोळ्यातील पाणी बघून तुम्ही असे वागला असाल, हे मी समजू शकते. त्यामुळे राजीनामे नामंजूर आहेत. दबावतंत्र करायला ही जागा पुरणार नाही, आम्ही कोणाच्या पुढे काही मागायला गेलो नाहीत. आपल्याला जर चांगले दिसलं नाही तर डोळे चोळून बघतो. त्यामुळे आता थोडे डोळे चोळून बघूया. पक्षाने जे दिले ते मी लक्षात ठेवले. पण मला काय दिले नाही तेही लक्ष ठेवा. केंदीय मंत्री नसले तरी मी राष्ट्रीय मंत्री आहे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

“कौरव आणि पांडवातील युद्ध पांडवांनी जिंकण्याचं आणखी एक कारण होतं. कौरवांच्या सैन्यातील लोक मनाने पांडवांसोबत होते आणि शरीराने कौरवांसोबत होते. कळलं का तुम्हाला. त्यांच्या रथावर असलेले सारथीसुद्धा त्यांच्यासोबत नसतील. काळ कधीच थांबत नसतो. तुमचं दुःख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू तुम्ही घरी घेऊन जा. मला काय मिळालं नाही, अशा चिल्लर लढाईत मला पडायचं नाही. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत. तुम्ही सगळे माझे महारथी आहात. काही लोकांनी असं भाष्य केलं की, पक्षाने दिलेलं विसरणार नाही. नेत्यांचे कान भरून मोठं होणारी मी नाही. मला दिलं. चंद्रकांत पाटील महसूलमंत्री झाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. आशिष शेलारांनीही चांगलं वक्तव्य केलं. मला आई आणि बाप अशा दोन्ही भूमिकेतून निर्णय घ्यावे लागतात”, अशी भूमिका पंकजा यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली.

Image
धर्मयुद्ध म्हणजे नेमकं काय?

कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी धर्मयुद्ध टाळायचं आहे, असं म्हटलं होतं. या धर्मयुद्ध शब्दाबद्दल त्यांनी भाष्य केलं. “मला डावलल्या जात आहे, अशी लोकांच्या मनात भावना आहे आणि ती तीव्र होत चालली आहे. डावलूनही मी काही करत नाही, असं लोकांना वाटतं. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक आहेत. मूळात गोपीनाथ मुंडे यांचा कार्यकर्ता आक्रमक आहे. आम्ही खूप संघर्ष केला. आम्हाला खूप संघर्षातून जावं लागलं. धर्मयुद्ध हे आहे की, माझ्यात आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना आहे. विधान परिषदेला फॉर्म भरायला लावला आणि रमेश कराडांना तिकीट दिलं. राज्यसभेसाठीही माझी चर्चा असताना भागवत कराडांना संधी दिली. पण, तिथंही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी गेले होते. मग आता मंत्रिमंडळात डावललं असं लोकांना वाटतं आहे. यामुळे कराड आणि इतर नेत्यांशी संबंध खराब होऊन नये म्हणून आम्हाला लढावं लागणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती राज्यभर प्रवास करून संघटन करतो. मग त्यानंतर नेत्याला संघटनेत स्थान नसल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होतेय,” असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.

May be an image of 4 people and people standing

पंकजा मुंडेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं

मी घरात बसणार आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार हे मान्य नाही

मी तुम्हाला शांत करण्यासाठी वेळ दिला आहे

तुम्ही जे केलं ते मला विचारून केलं का?

तुमच्या रक्तात राग आहे

May be an image of 1 person and indoor

लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात

मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजुर करत आहे

मी कोणतंही पद मिळवण्यासाठी राजकारणात नाही

मी तुमच्या प्रेमाबद्दल रून व्यक्त करते

तळागाळातील माणूस सर्व ठिकाणी पोहोचला पाहिजे हे मुंडे साहेबाना वाटतं होते

मुंडे साहेबाना वाटतं होत की महाराष्ट्राची व्हावी

मला राजकारणात आणलं कारण मोठ्या आणि भव्य विचाराने आणले

मंत्रिपदाची मागणी हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार नाहीत

मला कधी वाटलं नाही. मला मंत्री करा संत्री करा

मला दिल्लीत कुणीही झापलं नाही

माझ्या समाजाच्या मंत्र्याला मी कशाला अपमानित करू

भागवत कराड यांना मिळालेल्या मंत्रिपदावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

जोपर्यंत शक्य तोपर्यंत धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार

मी कुणालाही भीत नाही

आपलं घर का सोडायचं? राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंचा सवाल

माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा आहेत

मी पराभूत झाले मला वाईट वाटत नाही

मला दबाव तंत्र आणायची गरज नाही

तुम्हाला वाटतं मला छापले असेल

माझी पंतप्रधानांबरोबर चांगली चर्चा झाली

तुम्हाला वाईट दिसत आहे. जरा डोळे चोळून बघूया.

केंद्रीय मंत्री नाही तरी संघटन मंत्री आहे

प्रितम ताई मंत्री नाही झाल्या. मी 45 वर्षांची आहे. कराड साहेब 65 वर्षाचे आहे. मी त्यांचा अपमानित करणार नाही

मी कधी म्हटले नाही मला मुख्यमंत्री करा पण लोक पंतप्रधान होतो म्हणतात

आम्ही नविन काळातली योध्या आहे

मला शक्य आहे तोपर्यंत मी धर्म युद्ध रोखण्याचा प्रयत्न करेन

कौरवांच्या सेनेत अनेक लोक आहेत जे शरीराने त्यांच्या बरोबर आणि मनाने पांडवाबरोबर होते

इतक्या चिल्लर लढाईत मी पडत नाही

आज आपण धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहोत

सगळ्यांनी सांगितले की मिळायला पाहिजे होते

केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा

मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला

घर फुटल्याचं दु:ख आम्ही झेललं आहे