सातारा-देवळाईत भागाच्या विकासाकरिता मी कधी मागे हटणार नाही-आमदार संजय शिरसाट

सातारा देवळाईमध्ये पाण्याची टाकी व पाईप लाईनच्या कामाला सुरुवात

Displaying IMG_2896.JPG

औरंगाबाद ,१२जुलै /प्रतिनिधी :-आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते राज्य शासनाच्या माध्यमातून सातारा-देवळाई या भागाच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करून घेतला होता, त्याच निधीमधून आज सातारा-देवळाई या भागामध्ये रस्ते, भूमिगत गटार योजनेच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडले.  

या भूमीपूजन प्रसंगी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, बाप्पा दळवी, शहरप्रमुख विजय वाघचोरे, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, विभागप्रमुख हरिभाऊ हिवाळे, रणजित ढेपे, उपविभागप्रमुख मनोज सोनवणे, शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, संजीवन सरोदे, ईश्वर पारखे, बाळापुर ग्रामपंचायत सरपंच गणेश वाघ यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार शिरसाट म्हणाले की, मी सातारा-देवळाई या भागातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ दिला नाही आणि यानंतर ही जाऊ देणार नाही, या भागाच्या विकासाकरिता मी कधी मागे हटणार नाही. मी तुम्हाला जो शब्द दिला होता की, सातारा-देवळाई या भागाचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याच सातारा देवळाईमध्ये पाण्याच्या टाकीचे व पाईप लाईनचे देखील कामाला सुरुवात झाली आहे. तुमच्या ज्या काही समस्या असेल त्या मला सांगत चला, तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी या पश्चिम मतदारसंघाचे मी नेतृत्व करतो. सातारा देवळाई हा परिसर पाहण्यासाठी लोक येतील अशी विकासकामे या भागामध्ये मी करणार आहे. तसेच सातारा देवळाई या भागाच्या विकासासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खात्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे त्यांचे देखील मी आभार मानतो. या भागातील नागरिकांनी देखील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आमदार संजय शिरसाट यांचे आभार मानले.

Displaying IMG_2642.jpg

आज आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते
▪️मनपा वॉर्ड क्र. 115 सातारा गांव अंतर्गत मल्हारनगर गट नं. 81 येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे (14,99,952 रुपये).

▪️मनपा वॉर्ड क्र. 114 संग्रामनगर सातारा अंतर्गत सह्याद्रीनगर, संत ज्ञानेश्वर कॉलनी परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे. (9,99,893 रुपये).

▪️मनपा वॉर्ड क्र. 114 संग्रामनगर सातारा अंतर्गत रेणुका पुरम येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे. (24,99,830 रुपये).

Displaying IMG_2807.JPG

▪️मनपा वॉर्ड क्र. 114 देवळाई सातार अंतर्गत भूमी ब्युटी पार्लरपासून ते श्री. अशोक गाडघे मातोश्री निवासपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. (24,99,835 रुपये).

▪️मनपा वॉर्ड क्र. 114 संग्रामनगर अंतर्गत विद्यानगर येथे भुमिगत गटारीचे बांधकाम करणे.
(19,99,521 रुपये). या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी संतोष बारसे, दिनेश राजे भोसले, पंडित सुदर्शन, महेश साळुंखे, संदीप वाघ, योगेश बडवे, चतुरसिंग राजपूत, प्रवीण पवार, गजानन धानोरकर, कबीरसिंग राजपूत, आसाराम मरकड, राजेश जंगले पाटील, सचिन राठोड नितीन झरे पाटील, संतोष भानुदास जाधव, संजय जाधव, संतोष कांबळे, राजेंद्र तांबे पाटील, रामदास घायाळ, अनंत जाधव, गणेश निवाळकर, संजय भालेराव, युवराज बुरकुल, रंगनाथ कसबेकर, लक्ष्मण दहिहांडे, अनंत देशमुख, पवन शर्मा, शैलेश पवार, अनंत सुर्यवंशी, उमेश माने, गणगे महाराज, दिपक साळवे, सिद्धेश्वर सुरुंग, बंटी चौधरी, बाबासाहेब काळे, मुंगेकर, गुरु भाऊ, राजपूत अंकल, जितू पाटील, औताडे सर, देशमुख सर, संदीप बर्गाजे, जितु पाटील, प्रभाकर औरंगाबादकर, रामकृष्ण नाकाडे, तुषार गांगुर्डे, भारत सरोने, गंगवाल साहेब, स्वामी साहेब, तोपलेवर साहेब, मनीष शिंदे, अशोक सतदिवे, किरण सातदिवे, माऊली निकम, वसंतराव पवार, रोहन पवार, महिला ज्योती तांबे, र्निमला कसबेकर, लभडे, शामल शिंदे, इंदुबाई सातदीवे, सिधकला गांगुर्डे, सुजाता खैरनार आदींची उपस्थिती होती.