पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन

पंढरपूर, दि.१७: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरदेखील बंद आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी बंद असून या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. मंदिर बंद असल्याने भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची आता ऑनलाईन थेट सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन
• संकेतस्थळ- http://www.vitthalrukminimandir.org
• गुगल प्ले स्टोअरवरील ॲप- shreevitthalrukmnilive Darshan
• जिओ टीव्ही- जिओ दर्शन
• टाटा स्काय- ॲक्टिव्ह चॅनेल

वरील विविध माध्यमांतून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार भाविकांना पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *