भारतात कोविडमुक्त होणाऱ्या रूग्णांनी एकूण 3 कोटींचा टप्पा केला पार

भारताच्या कोविड – 19 लसीकरणाने ओलांडला 37.73 कोटींचा टप्पा

गेल्या 24 तासात 37,154 नवीन दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी दिल्‍ली,१२जुलै /प्रतिनिधी :-

भारताच्या  कोविड -19  महामारी विरोधातील लढाईत कोविडमुक्त होणाऱ्या रूग्णांनी एकूण 3 कोटींचा महत्वपूर्ण टप्पा केला पारकेला आहे. 

महामारीच्या प्रारंभापासून ते आतापर्यंत 3,00,14,713 रुग्ण कोविड – 19 संसर्गातून बरे झाले आहेत, गेल्या 24 तासात 39,649 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढता कल दर्शवित असून सध्या तो 97.22 % वर पोहोचला आहे.दुसऱ्या बाजूला भारताच्या एकूण लसीकरणाने 37.73 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजता उपलब्ध झालेल्या अहवालानुसार, एकूण 48,51,209 सत्रांमधून 37,73,52,501 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 12,35,287 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी प्रारंभ झाला आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

गेल्या 24 भारतात 37,154 दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे.

सलग 15 व्या दिवशी 50,000 पेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रसरकारच्या सातत्यपूर्ण आणि  सामूहिक प्रयत्नांचाच हा परिणाम आहे. 