भारताच्या कोविड-19 लसीकरणाने ओलांडला 37.21 कोटींचा टप्पा

गेल्या 24 तासात 42,766 नवीन दैनंदिन रुग्णांची नोंद

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या सध्या 4,55,033; एकूण रुग्णसंख्येपैकी 1.48%

नवी दिल्ली ,१०जुलै /प्रतिनिधी :- भारताच्या एकूण कोविड-19 लसीकरणाने काल 37.21 कोटींचा टप्पा ओलांडला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार 48,04,423 सत्रातून एकूण 37,21,96,268 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 30,55,802 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.गेल्या 24 तासात 42,766 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.सलग तेरा दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये/केंद्र शासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या सामूहिक प्रयत्नांचेच हे फळ आहे.भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,55,033 आहे. देशाच्या एकूण रुग्णसंखेपैकी ती फक्त 1.48% आहे.

महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत 2,99,33,538 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 45,254 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून सध्या तो 97.20% वर पोहचला आहे.महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत 2,99,33,538 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 45,254 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून सध्या तो 97.20% वर पोहचला आहे.

चाचण्यांच्या दरात एकीकडे वाढ होत असताना, साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरात सातत्याने घट दिसून येत आहे. सध्या साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दर 2.34% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.19% आहे. दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर सलग 19 दिवस 3% पेक्षा कमी आहे. तर सलग 33 दिवस तो 5% पेक्षा कमी आहे.