औरंगाबाद जिल्ह्यात 71 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 672 कोरोनामुक्त,479 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,८जुलै /प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 52 जणांना (मनपा 11, ग्रामीण 41) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 42 हजार 672 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 71 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 599 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 448 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 479 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (21)

गोल्डन सिटी पैठण रोड 1, सन्मित्र कॉलनी औरंगपूरा 1, छावणी 1, हर्सूल टी पाँईट 1, हर्सूल 1, एन-3 ठाकरे नगर 3, न्यु एस.टी.कॉलनी 3, औरंगाबाद 1, एन-6 सिडको, अविष्कार कॉलनी 1,  चौधरी कॉलनी 1, मुकुंद नगर, मुकुंदवाडी 1, देवळाई 2, चिकलठाणा 1, अन्य 3

ग्रामीण (50)

औरंगाबाद 1, गंगापूर 4, कन्नड 7, सिल्लोड 1, वैजापूर 13, पैठण 24,

मृत्यू ( 03)

घाटी (03)

1.पुरूष/52/वाहेगाव, गंगापूर.

2.पुरूष/97/मांळुजा, गंगापूर.

3.स्त्री/62/पैठण