डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला

नवी दिल्ली,८जुलै /प्रतिनिधी :- डॉ. भागवत कराड यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.

May be an image of 4 people, people standing, flower and indoor
आज डॉ. भागवत कराड यांनी अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांच्या खात्याचा कार्यभार नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे घेतला. यावेळी अर्थ खात्याचे सर्व सेक्रेटरी, व इतर अधिकारी उपस्थित होते, त्यावेळी भाजप चे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी महापौर बापू घडामोडे, अ‍ॅड.अतुल कराड उपस्थित होते व त्यांना पुढील कार्यास सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

डॉ.कराड हे पहिल्यांदाच राज्यसभेचे सदस्य झाले आहेत. ते समाजसेवेच्या क्षेत्रात सक्रीय असून, त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौरपद तसेच मराठवाडा कायदे विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ.कराड यांचे वय 64 असून, ते व्यवसायाने डॉक्टर आहेत.

Image

एमबीबीएस पदवीसोबतच, डॉ.कराड यांनी सामान्य शस्त्रक्रिया विषयात एमएस ही पदव्युत्तर पदवी मिळवली आहे, 

Image

तसेच त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठातून बालरोग शस्त्रक्रिया या विषयात एमसीएच आणि सामान्य शस्त्रक्रिया या विषयात एफसीपीएस या पदव्यादेखील मिळविल्या आहेत.