डॉ.श्रीमती भारती प्रवीण पवार यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला

नवी दिल्ली,८जुलै /प्रतिनिधी :-डॉ.श्रीमती भारती प्रवीण पवार यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.श्री. मनसुख मांडवीय  यांनी आज येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.

यावेळी आरोग्य सचिव श्री. राजेश भूषण,अतिरिक्त सचिव,(आरोग्य) वंदना गुरनानी ,राष्ट्रीय आरोग्य अभियान; संचालक डॉ. मनोहर अग्निनी,अतिरिक्त सचिव (आरोग्य )श्री. विकास शील,अतिरिक्त सचिव (आरोग्य) यांच्यासह मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.