केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; डॉ.भागवत कराड यांना अर्थ खात्याचे राज्यमंत्रीपद तर मराठवाड्यात प्रथमच रेल्वे राज्यमंत्रीपद रावसाहेब दानवेंकडे

Image

महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्री

केंद्रीय मंत्रिमंडळात औरंगाबादला प्रथमच स्थान 

May be an image of 1 person

नवी दिल्ली ,७ जुलै /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज फेरबदल व विस्तार झाला, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 43 मंत्र्यांना शपथ दिली. यात महाराष्ट्रातील एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा एकूण चार मंत्र्यांचा समावेश आहे.नारायण राणे यांना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खातं देण्यात आलंय. 

Image

भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्रिपद देण्यात आलंय. तर भारती पवारांकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रिपद सोपवण्यात आलंय. कपिल पाटील यांच्याकडे पंचायतराज राज्यमंत्रिपद दिलंय. तर मराठवाड्यात प्रथमच रेल्वे राज्यमंत्रीपद रावसाहेब दानवेंकडे आले आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. गुजरातमधील मनसुख मांडवीय यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Image
कपिल पाटील

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार समारंभात आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटकपक्षांच्या सदस्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यपदाची शपथ घेतली. यामध्ये 15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीयमंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्र्यांची शपथ

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल व विस्तारात आज महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्री पदाची तर खासदार सर्वश्री कपील पाटील, डॉ.भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली.

Image
डॉ. भारती पवार

माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार नारायण राणे, भिवंडी लोकसभा मतदार संघाचे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार कपील पाटील, दिंडोरी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदार डॉ.भारती पवार आणि नुकतेच राज्यसभेवर निवडून आलेले खासदार डॉ.भागवत कराड पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून कार्यभार पाहणार आहेत.

ज्येष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल 

खातेवाटपासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना अतिरिक्त पदभार तसेच खात्यांमध्येही बदल करण्यात आलाय. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. शाह यांच्याकडे  नव्या सहकार मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. अमित शाह यांच्याकडे आधीपासून गृह विभागाची जबाबदारी आहे. 

तर पीयूष गोयल यांच्याकडे असलेलं रेल्वेमंत्री पद काढून घेण्यात आलंय. त्याऐवजी त्यांना आता उद्योगमंत्री पद देण्यात आलंय. तर आता अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्री आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलीये.  

हरदीप पुरी यांना पेट्रोलियम विभागाची सूत्र सोपावण्यात आलेली आहे. पुरुषोत्तम रुपाला यांना दुग्ध व मत्स्यव्यवसाय मंत्रालय दिलं गेलंय. तर ज्योतिरादित्य सिंधीया यांना नागरी उड्डाण मंत्री पदाची सांभाळण्याची संधी मिळाली आहे. गिरीराज सिंग यांना ग्रामीण विकास मंत्रीपदाची जबाबदारी तर मीनाक्षी लेखी यांना संस्कृती राज्यमंत्री पद पदरी पडलंय.

Banner

पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार भारताच्या राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून खालील व्यक्तींची नेमणूक केली आहे: 

कॅबिनेट मंत्री

1. श्री नारायण तातू राणे

2. श्री सर्वानंद सोनोवाल

3. डॉ. वीरेंद्र कुमार

4. श्री ज्योतिरादित्य एम सिंधिया

5. श्री रामचंद्र प्रसाद सिंह

6. श्री अश्विनी वैष्णव

7. श्री पशु पति कुमार पारस

8. श्री किरेन रिजिजू

9. श्री राज कुमार सिंह

10. श्री हरदीप सिंग पुरी

11. श्री.मनसुख मांडवीय

12. श्री भूपेंद्र यादव

13. श्री परषोत्तम रुपाला

14. श्री जी. किशन रेड्डी

15. श्री अनुरागसिंग ठाकूर

राज्यमंत्री

1. श्री पंकज चौधरी

2. श्रीमती. अनुप्रिया सिंह पटेल

3. डॉ. सत्य पाल सिंग बाघेल

4. श्री राजीव चंद्रशेखर

5. सुश्री शोभा करंदलाजे

6. श्री भानु प्रताप सिंह वर्मा

7. श्रीमती. दर्शना विक्रम जरदोष

8. श्रीमती. मीनाक्षी लेखी

9. श्रीमती. अन्नपूर्णा देवी

10. श्री ए. नारायणस्वामी

11. श्री कौशल किशोर

12. श्री अजय भट्ट

13. श्री बी. एल. वर्मा

14. श्री अजय कुमार

15. श्री चौहान देवूसिंह

16. श्री भगवंत खुबा

17. श्री कपिल मोरेश्वर पाटील

18. सुश्री प्रतिमा भौमिक

19. डॉ.सुभाष सरकार

20. डॉ भागवत किशनराव कराड

21. डॉ.राजकुमार रंजन सिंह

22. डॉ. भारती प्रवीण पवार

23. श्री विश्वेश्वर टुडू

24. श्री शांतनु ठाकूर

25. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई 

26. श्री जॉन बारला

27. डॉ एल. मुरुगन

28. श्री निसिथ प्रामाणिक

राष्ट्रपतींनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात मंत्रीमंडळाच्या वरील सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार भारताच्या राष्ट्रपतींनी तात्काळ प्रभावाने मंत्रीमंडळातील खालील सदस्यांचा राजीनामा स्वीकारला आहे: –

  1. श्री डी.व्ही. सदानंद गौडा
  2. श्री  रविशंकर प्रसाद
  3. श्री थावरचंद गेहलोत
  4. श्री रमेश पोखरियाल ‘निशंक’
  5. डॉ. हर्ष वर्धन 
  6. श्री प्रकाश जावडेकर
  7. श्री संतोष कुमार गंगवार
  8. श्री बाबुल सुप्रियो
  9. श्री धोत्रे संजय शामराव
  10. श्री रत्तन लाल कटारिया
  11. श्री प्रताप चंद्र सारंगी
  12. श्रीमती देबश्री चौधरी

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी –  विज्ञान तंत्रज्ञान विभाग

अमित शहा – सहकार मंत्रालयाची जबाबदारी

नारायण राणे – सुक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग मंत्रालय

कपिल पाटील – पंचायत राज राज्यमंत्री

मनसुख मांडवीय – आरोग्य मंत्रालय, खते- रसायन मंत्रालय

अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्रालय

धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री, कौशल्य विकास मंत्रिपद

पियूष गोयल – वस्त्रोद्योग मंत्रालय

हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम मंत्रालय

ज्योतिरादित्य शिंदे – नागरी उड्डाण मंत्रालय

पुरषोत्तम रुपाला – दुग्धविकास, मत्स्योत्पादन मंत्रालय

स्मृती ईराणी – आता केवळ – बालविकास मंत्रिपद

मीनाक्षी लेखी – परराष्ट्र  राज्य मंत्री

अनुराग ठाकूर – युवा आणि क्रीडा मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पशुपती पारस – अन्न प्रक्रिया मंत्रालय

भुपेंद्र यादव – श्रम मंत्रायल 

भारती पवार – आरोग्य राज्यमंत्रालय 

भागवत कराड – अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री

रावसाहेब दानवे – रेल्वे राज्यमंत्री 

आर के सिंह – केंद्रीय कायदे मंत्री

मिनाक्षी लेखी – परराष्ट्र, सांस्कृतिक राज्यमंत्री

गिरीराज सिंह – ग्रामविकास मंत्रालय

आर के सिंह – ऊर्जा मंत्री

किरन रिजीजू – सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय

पशुपती पारस – अन्न प्रक्रिया उद्योग