सीएमआयएच्या अध्यक्षपदी शिवप्रसाद जाजू यांची तर सचिव म्हणून सतीश लोणीकर यांची निवड

औरंगाबाद ,५ जुलै /प्रतिनिधी :-

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए), २०२१-२२ या वर्षासाठी कार्यकारीणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून शिवप्रसाद जाजू यांची निवड झाली.सतीश लोणीकर यांची लागोपाठ दुसऱ्या वर्षी सचिवपदी निवड झाली. 

Displaying Mr Satish Lonikar, Newly Elected Hon.Secretary.jpg
सतीश लोणीकर

आज, म्हणजेच ५ जुलै २०२१ रोजी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर सीएमआयएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सीएमआयएच्या २०२१-२२ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारीणीची  निवड झाली.

२०२१२२ साठी नवनिर्वाचित पदाधिकारी:

शिवप्रसाद जाजू, अध्यक्ष

Displaying Mr Nitin Gupta, Newly Elected Vice President.jpg
नितिन गुप्ता

नितिन गुप्ता,उपाध्यक्ष

सतीश लोणीकर, सचिव

अनिल माळी , सहसचिव

प्रितीश चटर्जी, कोषाध्यक्ष

शिरीष  तांबे,सहकोषाध्यक्ष

कमलेश धूत, माजी अध्यक्ष

कार्यकारीणी सदस्य:अभयराज कपूर,अशोक काळे,नितीन काबरा,सुयोग माच्छर,रितेश मिश्रा,सुरेश ताडकर

 स्वीकृत सदस्य :दुष्यंत पाटील,डॉ.हिमांशु गुप्ता,मनोज पित्ती,निलेश कापडिया,राजेश पाटणी,रासदीपसींग चावला,सौरभ भोगले

माजी अध्यक्ष कमलेश धूत यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, आणि वर्ष २०२१-२२ साठी नवनिर्वाचित पदाधिका-यांचे स्वागत केले.

Displaying Mr Kamleish Dhoot, Imm.Past President.JPG
कमलेश धूत

कमलेश धूत म्हणाले की वर्ष २०२०-२१ सी.एम.आय.ए. ने यशस्वीरित्या अंमलबजावणी केलेल्या ’फाईट अगेन्स्ट कोव्हीड’ ने सी.एम.आय.ए.ला मानवतेचा चेहरा दिला.या उपक्रमाद्वारे विविध वैद्यकीय उपकरणे  कोव्हीड -१९ साथरोगाच्या उपचारासाठी सी.एम.आय.ए.च्या सदस्यांच्या योगदानातून देणगी स्वरूपात देण्यात आली.यात मुख्यत्वेकरून ऑक्सीजन जनरेशन प्लॅंट( कॅपॅसिटी १२५  सिलिंडर पर डे)  तसेच आर.एन.ए. एक्स्ट्रॅक्शन मशीन या वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. ’फाईट अगेन्स्ट कोव्हीड’ तसेच सी.एम.आय.ए. बिल्डिंग प्रोजेक्ट ला देणगी देणा-या सदस्यांचे आभार मानले.

या प्रसंगी नवनिर्वाचीत अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनी नवनवीन औद्दोगिक  गुंतवणुक आकर्षीत करण्यासाठी तसेच निर्यात वाढीसाठी तसेच निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, स्किल डेव्हलपमेंट, नवकल्पना (इनोव्हेशन) तसेच इन्क्युबेशन वाढवीण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कोव्हीड -१९ साथरोगाच्या प्रभावामुळे ज्या उद्योगांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे अशा उद्योगांना मदतीसाठी प्रयत्न केले जातील.

नवनिर्वाचित मानद सचिव सतीश लोणीकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तसेच आभार प्रदर्शन केले.सतीश  लोणीकर यांनी आश्वासन दिले की नवनिर्वाचित पदाधिकारी चेंबरला अधिक सक्रिय करण्यासाठी परिश्रम घेतील.