जकेकुर चौरस्त्यातील हाॅटेल्सवर छापा,देहविक्री करणाऱ्या १७ युवतीसह ३० जणांना अटक

उमरगा , १जुलै / नारायण गोस्वामी
उस्मानाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत येथील राष्ट्रीय महामार्गावर  जकेकुर चौरस्त्या परिसरातील तीन टाकून बुधवारी दुपारच्या सुमारास देहविक्री करणाऱ्या १७ युवतीसह ३० जणांना अटक करून गुन्हा दाखल केला असून आरोपी मध्ये हॉटेल चालकांचा समावेश आहे.

शहरापासून जवळच असलेल्या जकेकुर चौरस्ता परिसरात असलेल्या अनेक हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात  वेश्याव्यवसाय सुरू असताना  स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्ष होत होते.चौरस्ता येथील सुदर्शन हॉटेल व लॉज ,अभिराज हॉटेल व लॉज या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या गुप्त माहिती मिळाल्यानंतर ,उस्मानाबाद जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेचे तडफदार पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी, पथका सह बुधवारी या भागातील तीन हाॅटेल व लॉजवर कारवाई करुन वेश्याव्यवसाय करणाऱ्या तब्बल १७युवती आणि १३ युवकांना ताब्यात घेतले. दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली कारवाई साडेतीन वाजता पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वांना उमरगा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा तिन गुन्हे  दाखल  झाले .
पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, पोलिस उपअधीक्षक संदिप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने, पोलिस उपनिरीक्षक सदानंद भुजबळ,पोलीस कर्मचारी वलीऊल्ला काझी, प्रदिप ठाकुर, राजेश साळुंके, शिवाजी शेळके, पोलिस नाईक महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, दिपक लावरे-पाटील, महिला पोलिस नाईक शैला टेळे, रंजना होळकर, बबन जाधवर, बलदेव ठाकुर, अविनाश मरलापल्ले, रविंद्र आरशेवाड, चालक धनंजय कवडे, सुभाष चौरे, अमोल कावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.