लग्न समारंभ:शनिवार व रविवारच्या निर्बंधा बाबत शिथिलता

पर्यटन स्थळे दुपारी 4.00 वाजेपावेतो चालू ठेवण्यास मुभा

‘ब्रेक द चेन’ आदेशातील काही बाबींबाबत सुधारित आदेश निर्गमित

औरंगाबाद ,३०जून /प्रतिनिधी :- कोविड-19  संसर्ग साखळी (Levels  of Restrictions for Safe  Maharashtra ) तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 28 जुन रोजी सविस्तर आदेश निर्गमित केलेले आहेत. या आदेशातील काही बाबींमध्ये सुधारणा (Clarification) निर्गमित करण्यात येत असून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध बाबत सुधारित आदेश लागू करण्यात येत  असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

अ.क्र.बाब / तपशील                              निर्बंधांबाबत सुचना
1लग्न समारंभ·        तिथीनुसार पूर्व नियोजित साखरपुडा हळदी लग्न इ. समारंभ कार्यक्रम असल्याने त्यासाठी  Weekly lockdown (शनिवार व रविवारच्या निर्बधा बाबत शिथिलता देण्यात येत आहे. याशिवाय इतर समारंभकार्यक्रमासाठी शनिवार व रविवारी ग्राहक / पाहूणे / हॉटेल मंगल कार्यालयात आल्यास दंडात्मक / सिलिंगची कारवाई करण्यात येईल.
2मॉल·        Food court , आसन व्यवस्थेसह असलेले खाद्यगृह , इत्यादी ठिकाणी केवळ Home delivery (घरपोच) पार्सल सुविधा रात्री 08.00 वाजेपर्यंत  चालू ठेवण्यास मुभा राहिल.
3पर्यटन स्थळे1. बीबी का मकबरा2. औरंगाबाद लेणी3. वेरूळ लेणी4. अजिंठा लेणी5. दौलताबाद किल्ला ·        सकाळी 7.00 वाजेपासून ते दुपारी 4.00 वाजेपावेतो चालू ठेवण्यास मुभा राहिल.·        (दुपारी 4.00 वाजता उपस्थित पर्यंटकांची पर्यटनस्थळावरून बाहेर पडणे Exit होण अनिवार्य. )·        सायंकाळी 05.00 वाजेनंतर कुठेही वावरण्यास मनाई                       (No Movement Outside Bubble)     ·        सकाळच्या सत्रात (First Half ) 500 पर्यटक·        दुपारच्या सत्रात (Second Half ) 500 पर्यटकांना अनुमती 
4घरगुती गॅस सिंलेडंर पुरवठा·        फक्त सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत
उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे.1)मास्क वापरणे  2) 2 गज दुरी (6 फुट अंतर) 3)सॅनीटायझर 4)आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य

सदर आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत लागू राहिल. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहिल असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.