भारताच्या आर्थिक परिदृश्यात जीएसटी हा मैलाचा दगड ठरला आहे : पंतप्रधान

जीएसटीच्या अंमलबजावणीला 4 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक

नवी दिल्‍ली, ३०जून /प्रतिनिधी :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी अंमलबजावणीला 4 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कौतुक केले आहे. ते म्हणाले की, भारताच्या आर्थिक परिदृश्यात  हा एक मैलाचा दगड ठरला आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “जीएसटी हा भारताच्या आर्थिक परिदृश्यात एक मैलाचा दगड ठरला आहे. यामुळे  करांची संख्या, अनुपालनाचे ओझे आणि सर्वसामान्यांवरील एकूणच करांचा भार कमी झाला असून पारदर्शकता, अनुपालन आणि संकलनात लक्षणीय वाढ होत आहे. #4YearsofGST”