राज्यात दिवसभरात ८ हजार ६२३ रूग्ण करोनामुक्त, तर ८ हजार ८५ नवे करोनाबाधित

मुंबई ,२९ जून /प्रतिनिधी :- महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 8 हजार 85 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आज कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्यांचा आकडा हा जास्त आहे. दिवसात 8 हजार 623 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 58 लाख 9 हजार 548 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्के इतका झाला आहे. 

आज करोनाबाधित व करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येतील फरक हा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले.राज्यात आजपर्यंत एकूण ५८,०९,५४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१३,९८,५०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,५१,६३३ (१४.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२१,३७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,१७,०९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.