बाबासाहेब आंबेडकर यांची तत्त्वे आणि मूल्ये यावर आधारित समाज उभारणी आणि राष्ट्र उभारणी यातच आपले खरे यश सामावलेले आहे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपतींच्या हस्ते लखनौमध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर स्मृतिस्थळ आणि सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी

Image

लखनौ ,२९जून /प्रतिनिधी :-​ बाबासाहेबांची तत्वे आणि मुल्ये यावर आधारित समाजाची आणि राष्ट्राची उभारणी करणे यातच आपले खरे यश सामावले आहे, असे उद्गगार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज काढले. या दिशेने आपण काहीएक प्रगती केली असली तरी अजून बरीच प्रगती करावयाची  बाकी आहे असेही ते म्हणाले.

लखनौमध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर स्मृती स्थळ आणि सांस्कृतिक केंद्राच्या पायाभरणी समारंभात आज  म्हणजे 29 जून 2021 रोजी ते बोलत होते.

डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्व आणि राष्ट्र उभारणीत त्यांनी दिलेले अनमोल योगदान यातून त्यांची असामान्य क्षमता आणि बुद्धिमत्ता दिसून येते, असे राष्ट्रपती म्हणाले ‌.

Image

 शिक्षणतज्ञ , अर्थतज्ञ, विधिज्ञ, राजकारणी, पत्रकार, समाजशास्त्रज्ञ, समाजक्रांती घडविणारे नेते एवढीच त्यांची ओळख नाही तर संस्कृती, धर्म आणि अध्यात्म या क्षेत्रातही त्यांनी बहुमूल्य योगदान दिले आहे.

तत्वनिष्ठता , समता, स्वाभिमान आणि भारतीयत्व ही बाबासाहेबांच्या दूरदृष्टीची चार सर्वात महत्त्वाची तत्वे होती, असे राष्ट्रपती म्हणाले.

त्यांच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये या चार तत्त्वांची चुणूक दिसून येते.‌ संस्कृतीसंबधीचे त्यांचे विचार हे परस्परसौहार्दावर आधारित होते. डॉक्टर आंबेडकरांनी भगवान बुद्धांचा संदेश सर्वदूर नेला.

स्त्रियांना समान हक्क देण्याच्या विचाराचा डॉक्टर आंबेडकरांनी नेहमीच पुरस्कार केला, असे राष्ट्रपती म्हणाले.त्यांनी लिहिलेल्या संविधानाने स्त्रियांना पुरुषांएवढेच मूलभूत अधिकार दिले आहेत.

स्थावर जंगम मालमत्तेचा  वारसा , लग्न तसेच इतर गोष्टीसंबंधी वारसा हक्क यातून समानतेचा मूलभूत हक्क स्थापित करण्यासाठी सुस्पष्ट कायदेशीर पाया एका स्वतंत्र कायद्याद्वारे घातला जायला हवा असे डॉक्टर आंबेडकरांचे म्हणणे होते.

Image

महिलांना वारसा हक्क यासारख्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सुचवलेल्या मार्गावरून आज आपली न्यायव्यवस्था  मार्गक्रमणा करत आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. लखनौ इथे बाबासाहेबांचे स्मृतिस्थळ म्हणून सांस्कृतिक केंद्राची उभारणी करण्याच्या उत्तर प्रदेशाच्या निर्णयाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.