औरंगाबादेतील मॉल्स, चित्रपटगृहे, नाटयगृहे पूर्णपणे बंद

  • पर्यटन स्थळे क्षमतेच्या 50 टक्के प्रमाणे खुले राहणार
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद
  • कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करा -जिल्हाधिकारी चव्हाण

औरंगाबाद ,२८जून /प्रतिनिधी :- राज्यातील Delta Plus Variant चा संभावित संसर्गाचा धोका लक्षात घेऊन  कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे (Levels of Restrictions for Safe  Maharashtra)  नुसार सर्व जिल्हयांना  Level-3  च्या दिलेल्या निर्बधाच्या  सुधारित अटी व शर्तीचा अवलंब अनिवार्य करणे बाबत निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन  करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. 

औरंगाबाद जिल्हयातील कोविड-19 विषयक बाधित परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे जिल्हयातील शहरी रुग्णांची टक्केवारी 1.31 टक्के (Positivity)व ग्रामीण रुग्णांची टक्केवारी 2.59 टक्के (Positivity) ऐवढी असून एकूण औरंगाबाद जिल्हयांतील रुग्णांची टक्केवारी 2.13 टक्के (Positivity) असून व्यापलेल्या ऑक्सीजन बेडची औरंगाबाद शहराची टक्केवारी 6.39 टक्के व ग्रामीण बेडची टक्केवारी 2.96 टक्के अशी एकूण ऑक्सीजन बेडची औरंगाबाद शहराची टक्केवारी 6.02 टक्के आहे . जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर व  महानगरपालिका आयुक्त औरंगाबाद यांच्या संयुक्त स्वाक्षरीने औरंगाबाद जिल्हा क्षेत्राकरिता 29 जुन  रोजीचे सकाळी 07.00 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध बाबत (Levels of Restrictions for Safe  Maharashtra) आदेश लागू करण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

अ.क्र.बाब / तपशीलनिर्बंधांबाबत सुचना
1सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना       विशेष सूचना : सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व तदनंतर                               सकाळी 7.00 वाजेपर्यंत संचारबंदी.·         संपूर्ण आठवडाभर सायंकाळी 05.00 वाजेनंतर नागरिकांच्या संचारावर कडक नियंत्रण असेल.
2अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकानेदररोज सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत
3अत्यावश्यक वस्तू व सेवा व्यतीरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकानेसोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते 04.00 वाजेपर्यंतशनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद
4मॉल्स / चित्रपटगृहे / नाटयगृहेपूर्णपणे बंद
5रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळीसोमवार ते शुक्रवार (Week Days) सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 या वेळेत 50% आसन क्षमतेनुसार Dining·         सायं. 4.00 नंतर पार्सल सेवा चालू राहिल व·          शनिवार आणि रविवार (Weekend) फक्त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहतील.
6सार्वजनिक ठिकाणे/क्रीडांगणे,मोकळ या जागा, उद्याने /बगिचे, Morning Walk व सायकलींगदररोज सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 वाजेपर्यंत
7खाजगी आस्थापनासोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत शासन आदेश दिनांक 04 जून 2021 च्या निर्देशानुसार वगळण्यात आलेल्या सर्व आस्थापना जसे, खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्था व गैर-बँकींग वित्त-संस्था इ. कार्यालये नियमीतपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरु राहतील.
8कार्यालयीन उपस्थितीशासकीय/निमशासकीय/खाजगी    इतर कार्यालये क्षमतेच्या 50%·      कोरोना विषयक कामे करणा-या आस्थापना, कृषी, बँक मान्सुनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. 
9क्रीडाबाहेर मोकळया जोगत (Out Door) सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 व सायंकाळी 06.00 ते रात्री 09.00 या वेळेत.
10चित्रीकरण (Shooting)सायंकाळी 4.00 वाजे पर्यंत मुभा·         सायंकाळी 05.00 वाजेनंतर कुठेही वावरण्यास मनाई          (No Movement Outside Bubble)
11स्नेहसंमेलने(Gathering), सामाजिक, सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रमसोमवार ते शुक्रवार सभागृह/ हॉल / मैदान आसन क्षमतेच्या 50% उपस्थितीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत
12विवाह संमारंभ50  लोकांच्या उपस्थितीत
13अंत्यविधी20 लोकांच्या उपस्थितीत
14सभा / निवडणुका,स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांचे आमसभा सभागृह / हॉल / मैदान आसन  क्षमतेच्या 50% 
15बांधकामफक्त बांधकाम साईटवर निवासी/वास्तव्यास मुभा·         बाहेरुन मजूर आणण्याचे बाबतीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत
16कृषी संबंधीत बाबीसंपूर्ण आठवडाभर सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत
17ई-कॉमर्स वस्तु व सेवानियमित पूर्ण वेळ : दररोज
18जमावबंदी/संचारबंदी·         जमावबंदी (5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मज्जाव) सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत,·         संचारबंदी सायंकाळी 05.00 नंतर (फक्त अत्यावश्यक कामांसाठी मुभा)
19जीम/ सलुन/ ब्युटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटरदररोज सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत क्षमतेच्या 50%पूर्व- परवानगीसह (Appointment), ए.सी. च्या वापरास मनाई.
20जलतरण तलाव (Swimming Pool)क्रीडा-संकुल (Sports Complex), स्‍वंतत्र जलतरण तलाव, जीम , हॉटेल्‍स यांना संलग्‍नीत सर्व जलतरण तलाव पूर्णपणे बंद राहतील.
21सार्वजनिक बस वाहतूकपूर्ण आसन क्षमतेने परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे.
22कार्गो वाहतूक सर्व्हीसेस (जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह)नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज.
23अंतर जिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार, टॅक्सी, बस) व ट्र्रेननियमीतपणे, जर प्रवासी लेवल 5 मधील भागातून अथवा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ई-पास आवश्यक राहिल.
24उत्पादन क्षेत्र (Export Oriented Units) (निर्यात प्रधान उद्योग) नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज 
25उत्पादन क्षेत्र (1. अत्यावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चा माल उत्पादक पॅकेजींग व संपूर्ण साखळीतील सेवा 2. निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग 3. संरक्षण संबंधित उद्योग 4. डेटा सेंटर/ क्लॉवुड सर्व्हिस प्रोवायडर/ माहिती तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सेवा व उद्योग) नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज
26उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रधान उद्योग व शासनाच्या आदेश दि. 04 जून 2021 मधील मुद्दा क्र. 23 व 24 मधील बाबी वगळून इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा) 50% स्टाफचे हालचालीचे परवानगीसह( With Transport Bubble ) 
27शहर / ग्रामीण  कटकमंडळ (Cantonment zone)  क्षेत्रातील  आठवडी बाजार चालू करणे.आठवडी बाजार / भाजी मंडई चालू करणेसाठी संबंधीत बाजारातील सर्व  व्यापारी,छोटे विक्रेते ,दुकान चालक यांना लसीकरण  Covid 19 चाचणी  करणे अनिवार्य राहिल.संबंधीत सर्व व्यक्तीचे या अटी व शर्तीसह आठवडी बाजार खुले राहण्यास मुभा राहिल 
उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे.        1)मास्क वापरणे  2) 2 गज दुरी (6 फुट अंतर) 3)सॅनीटायझर 4)आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य 
               कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे(Levels of Restrictions for Breaking The Chain) आदेश दिनांक 04 जून 2021 नुसार अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करण्यात आलेल्या बाबी : 
अत्यावश्यक सेवा : 1. रुग्णालय, रोग निदान केंद्र, चिकित्‍सालय , लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे    
     निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगिक उत्पादन आणि     वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जतुके, मास्क,     वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत  कच्चा माल उद्योग आणि अनुषंगिक सेवा यांचे उत्पादन व वितरण     यांचादेखील समावेश असेल. 2. शासकीय व खाजगी  पशुवैद्यकीय सेवा,  दवाखाने, पशु संगोपन केंद्र व  पशु खादयाची दुकाने. 3. सर्व वने व त्यासंबंधीत विभागाच्या अत्यावश्यक बाबी. 4. विमान व त्यासंबंधी पूरक सेवा (हवाई सेवा, विमानतळे तत्संबंधी दुरुस्तीसेवेच्या बाबी, कार्गो सेवा. 5. किराणा सामानाची  दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई / चॉकलेट / केक/ खाद्य/‍मटन,     चिकन, अंडी, मासे इ. दुकाने. 6. शितगृहे आणि साठवणुकीची गोदाम सेवा  7. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे की, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस. 8. स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व सेवा. 9. स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा . 10.रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा 11.सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था , स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स,     क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ 12. दूरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी 13 मालाची / वस्तुंची वाहतूक. 14. पाणीपुरवठा विषयक सेवा 15.शेती संबंधित सेवा आणि शेतीशी निगडीत सर्व कामामध्ये सातत्य राहावे याबाबत शेतीकामासाठी लागणाऱ्या सर्व     अनुषंगिक सेवा, बी-बियाणे, खते, औजारे आणि त्यांची दुरूस्ती सेवा यांचाही समावेश असेल. 16.सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची व उत्‍पादनाची आयात – निर्यात 17. ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत) 18.मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा 19.पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा  20.सर्व प्रकारच्या कार्गो सेवा 21.डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा   सेवा  22.शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा  23.विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा 24.ATM’s 25.पोस्टल सेवा  26.कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी      संबंधित वाहतूक)                                           27.अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग

5. सूट देण्यात आलेल्या बाबी (Exemption Category) मध्ये खालील बाबींचा समोवश राहिल

a) केंद्र सरकार, राज्य शासन व स्थानिक शासकीय विभागांची कार्यालये व त्यांची वैधानिक मंडळे व संस्था यांची  कार्यालये

b) सहकारी, खाजगी व PSU बँका, पतसंस्था,

c) अत्यावश्यक सेवा देणा-या कंपन्यांची कार्यालये,

d) विमा/वैद्यकीय विमा कंपन्या (Insurance/Mediclaim Companies)

e) औषधनिर्मिती कंपन्यांची उत्पादन व वितरण सेवांकरिता गरजेची असलेली कार्यालये

f) न्यायालय (Courts), न्यायाधिकरण (Tribunals) किंवा चौकशी पथकांचे (Commissions of

Enquiries) कामकाज चालू असल्यास विधीज्ञांची कार्यालये (Offices of Advocates)

g) RBI द्वारे नियंत्रित केल्या जाणा-या संस्था व मध्यस्थी करणा-या संस्था (intermediaries

   including Stand-alone primary dealers, CCIL, NPCI, payment system operators) HITOT

   RBI द्वारे नियंत्रित केल्या जाणा-या बाजारांमध्ये काम करणारे सर्व आर्थिक बाजारातील भागीदार.

·         सर्व बँकींग सेवा न देणा-या वित्तीय संस्था (All Non-Banking Financial Corporations)

·         सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था (All Micro Finance Institutions)

विशेष सूचना

1.       आंतरराज्य प्रवाशी वाहतुकीबाबत शासनाकडून वेळोवेळी येणा-या स्वतंत्र आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

2.      जिल्ह्यामध्ये दर आठवड्यातील झालेल्या RTPCR चाचण्यांवरुन येणारा कोविड-19 सकारात्मक अहवाल

असलेल्या रुग्णांचा साप्ताहिक दर (Positivity Rate) व रुग्णांसाठी वापरात असलेल्या ऑक्सीजन बेडसची टक्केवारी याबाबत शहर / ग्रामीण आरोग्य विभाग ,औरंगाबाद यांचेकडून दर गुरुवारी प्राप्त होणाऱ्या      

            माहितीचे आधारे संदर्भ क्र.14 च्या आदेशान्वये नमूद असलेल्या 3 ते 5 स्तरांपैकी ज्या स्तरातील (Level)       

            निर्बंध औरंगाबाद  जिल्ह्यामध्ये लागू करणे आवश्यक आहे त्याबाबत स्वतंत्र काढण्यात येईल व या     

           आदेशान्वये ज्या स्तरातील (Level) निबंध औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लागू होतील.

3.      उपरोक्त 1 ते 27 मध्ये नमूद सर्व आस्थापना सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत चालू राहतील त्या मधील कामगार अथवा त्यामधून सेवा देणा-या व्यक्ती यांनी सर्व हिशोब व व्यवहार प्रक्रिया पूर्ण करणे व संबंधित आस्थापना बंद करुन सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत घरी पोहचणे आवश्यक राहिल.

4.     लोकजागृतीतून लसीकरण मोहीम राबवण्यावर भर दण्यात यावा  . लसीकरणास पात्र लाभार्त्रीच्या  कमीत कमी 70 % लसीकरण झाले पाहिजे. विशेष करून औद्यौगिक आस्थापनावरील सर्व कामगारांचे प्रधान्याने  पुर्ण लसीकरण  करून घ्यावे.

5.     कोविड -19 चाचणी – रुग्णांचा शोध आणि उपाचार पध्दतीचा अवलंब करुण कोविड प्रसार रोखण्यासाठी    

           सर्व उपाय योजना करणे

6.      सर्व आस्थापनांना  कार्यालयाच्या  ठिकाणी कोविड सुरक्षित वातावरण राखण्यासाठी कामकाजाच्या ठिकाणी   स्वास्थ्यास पोषक  वायुवीजन (Ventilation Norms)  निकषाप्रमाणे कर्मचाऱ्याची बैठक व्यवस्था ठेवावी.

7.     मोठया प्रमाणावर RT-PCR चाचण्या करून घेण्यावर विभाग मार्फत अनिवार्य  करण्यात यावे.

8.     Covid Appropriate Behavior (CAB)  उल्लंघन करणा-यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.

9.      समारंभ /कार्यक्रम/उपक्रम/सभा/संमेलंने टाळणे आवश्यक जेणे करून गर्दी होणार नाही.

10.   शासनाच्या आरोग्य विभागाच्या मागदर्शक सूचनेप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्रे (Containment zones) जाहीर करण्याबाबत  कार्यवाही केली जाईल. जेणे करून कोविड-19 बाधीत रुग्ण संख्या असलेल्या  लहान क्षेत्र / भागामध्ये   देखील प्रतिबंधात्मक उपयोजनाची प्रभावी अमलबजाणी करण्यात येईल.

11.   सर्व उदयोग,व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचा-यांना निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहिल.(वैधता 15 दिवसांकरिता) निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवालाशिवाय दुकान/व्यवसाय सुरु करता येणार नाही.

विशेष सूचना : ज्या मुद्दयांमध्ये आसन क्षमतेचा उल्लेख आहे अशा सर्व आस्थापनांनी त्यांची एकूण आसन क्षमता घोषित करणारा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. अन्यथा ते कारवाईस पात्र ठरतील.

12.  या नियमांचे उल्लंघन केल्यास कोराना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तो पर्यंत संबंधित      दुकान/आस्थापनावर दंडात्मक कारवाई/बंद ठेवण्यात येईल, तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाप्रमाणे दंड आकारण्यात येईल.

13.   जत्रा / यात्रा , दिंडी व धार्मिक स्थळावर गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम घेण्यास बंदी राहिल.

14. सार्वजनिक स्थळावर मोर्चा, धरणे, आंदोलने व इतर तत्सम बाबी करण्यास मनाई राहिल.

15.  उक्त निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी  तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त महानगरपालिका, नगरपालिका / नगर पंचायत मुख्याधिकारी यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी Incident Commander जिल्हाधिकारी व  तहसिलदार यांची राहिल.

·         निम्न स्वाक्षरीकार प्रस्तुत आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील

·         सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 28 जून 2021 चे सकाळी 07.00 वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहिल.

सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहिल असेही जिल्हह प्रशासनाने कळविले आहे.