महामारीच्या काळात भारत-जपान मैत्री ही जागतिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी आणखी महत्त्वाची बनली आहे: पंतप्रधान

ऑटोमोबाईल, बँकिंगपासून बांधकाम आणि औषध निर्मितीपर्यंतच्या 135 हून अधिक कंपन्यांनी गुजरातमध्ये आपले उद्योग बसविले: पंतप्रधान

नवी दिल्ली,२७जून /प्रतिनिधी :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अहमदाबाद येथील अहमदाबाद व्यवस्थापन संस्थेत झेन गार्डन आणि कैझन अकादमीचे उद्घाटन केले.

झेन गार्डन आणि कैझेन अकादमीचे समर्पण, भारत-जपान संबंधांच्या सुलभतेचे आणि आधुनिकतेचे प्रतीक म्हणून संबोधित करताना पंतप्रधानांनी ह्यॅगो प्रीफेक्चरच्या नेत्यांचे विशेषतः ह्यॅगो इंटरनॅशनल असोसिएशनचे गव्हर्नर तोशीजो ईदो यांचे झेन गार्डन आणि कैझन अकादमीच्या स्थापनेत दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. भारत जपान संबंधांना नवीन आयाम दिल्याबद्दल त्यांनी गुजरातच्या इंडो-जपान फ्रेंडशिप असोसिएशनचेही कौतुक केले.

‘झेन’ आणि भारतीय ‘ध्यान’ या दोहोंमधील समानतेकडे लक्ष वेधून पंतप्रधानांनी दोन्ही संस्कृतीमधील भौतिक प्रगती आणि विकासासह मनःस्वास्थ्यावर भर देण्याबाबत लक्ष वेधले. भारतीयांनी युगानुयुगे योगामध्ये अनुभवलेल्या शांती, संयम आणि साधेपणाची झलक त्यांना या झेन गार्डनमध्ये आढळेल. बुद्धांनी हे ‘ध्यान’, हा प्रकाश जगाला दिला, असे पंतप्रधान म्हणाले. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी कैझनचा लौकिकार्थ आणि गर्भितार्थ यावर प्रकाश टाकला जे केवळ ‘सुधारणेवर ’ नव्हे तर ‘सातत्यपूर्ण सुधारणेवर’ भर देतात.

पंतप्रधान म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गुजरात प्रशासनात कैझनची अंमलबजावणी केली. वर्ष 2004 मध्ये गुजरातमधील प्रशासकीय प्रशिक्षणात याची सुरूवात झाली आणि  2005 मध्ये सर्वोच्च नागरी सेवकांसाठी एक विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेले. ‘सातत्यपूर्ण सुधारणा’ प्रक्रियेच्या सुसंस्कृतपणात प्रतिबिंबित झाली ज्याचा प्रशासनावर सकारात्मक परिणाम झाला. राष्ट्रीय प्रगतीमध्ये कारभाराचे महत्त्व कायम ठेवत पंतप्रधानांनी अशी माहिती दिली की पंतप्रधान झाल्यावर त्यांनी कैझन संबंधित गुजरातचे अनुभव पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारच्या इतर विभागांपर्यंत आणले. यामुळे प्रक्रियेचे सुलभीकरण आणि कार्यालयीन जागेचा सुनियोजित वापर झाला आहे. केंद्र सरकारच्या अनेक विभाग, संस्था आणि योजनांमध्ये कैझनचा वापर केला जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी जपानशी असलेले त्यांचे वैयक्तिक संबंध आणि जपानमधील लोकांचा स्नेह, त्यांची कार्य संस्कृती, कौशल्य आणि शिस्त याबद्दल त्यांची कृतज्ञता अधोरेखित केली. ते म्हणाले की, “मला गुजरातमध्ये मिनी-जपान बनवायचे आहे” या दाव्यात जपानी लोकांची भेट घेण्याची आकांक्षा प्रदर्शित होते.

‘व्हायब्रंट गुजरात समिट’ मध्ये अनेक वर्षांपासूनच्या जपानच्या उत्साही सहभागाबद्दल पंतप्रधानांनी उल्लेख केला. ते म्हणाले, ऑटोमोबाईल, बँकिंगपासून बांधकाम आणि औषध निर्मितीपर्यंतच्या 135 हून अधिक कंपन्यांनी गुजरातमध्ये आपले बस्तान बसविले आहे. सुझुकी मोटर्स, होंडा मोटरसायकल, मित्सुबिशी, टोयोटा, हिताची या कंपन्या गुजरातमध्ये उत्पादन करण्यात गुंतलेल्या आहेत. स्थानिक युवकांच्या कौशल्य विकासात त्या योगदान देत आहेत. गुजरातमध्ये उत्पादनाशी संबंधित तीन जपान-भारत संस्था शेकडो तरुणांना तांत्रिक विद्यापीठे आणि आयआयटीच्या मदतीने  कौशल्य प्रशिक्षण देत आहेत. याव्यतिरिक्त, जेट्रोचे अहमदाबाद बिझिनेस सपोर्ट सेंटर एकाच वेळी पाच कंपन्यांकरिता प्लग आणि प्ले वर्क-स्पेस सुविधा प्रदान करीत आहे. याचा फायदा अनेक जपानी कंपन्यांना होत आहे. विशेष म्हणजे बारकाव्यांकडे लक्ष वेधून घेण्याच्या बाबतीत पंतप्रधानांनी आठवण करुन दिली की जेव्हा एका अनौपचारिक चर्चेच्या वेळी त्यांना समजले की जपानी लोकांना गोल्फ आवडते तेव्हा त्यांनी गुजरातमधील गोल्फ सुविधा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यावेळी गुजरातमध्ये गोल्फ कोर्स फारसे आढळत नव्हते. आज गुजरातमध्ये अनेक गोल्फ कोर्स आहेत. त्याचप्रमाणे गुजरातमध्येही जपानी रेस्टॉरंट्स आणि जपानी भाषेचा प्रसार होत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

जपानच्या शाळा प्रणालीवर आधारित गुजरातमधील शाळांचे मॉडेल तयार करण्याची इच्छा देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली. जपानच्या शालेय प्रणालीत आधुनिकता आणि नैतिक मूल्ये झिरपल्याबद्दल त्यांनी आपली कृतज्ञता अधोरेखित केली. टोकियोमधील ताईमेइ एलिमेंटरी स्कूलमध्ये भेट दिल्याचा त्यांनी प्रेमपूर्वक उल्लेख केला.

जपानबरोबर शतकानुशतके जुने सांस्कृतिक संबंध आणि भविष्यासाठी समान दृष्टीकोन आहे असे मोदींनी सांगितले. जपानबरोबर विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी मजबूत करण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान कार्यालयातील जपान प्लस यंत्रणेविषयीही त्यांनी माहिती दिली.

जपानच्या नेतृत्वाशी असलेले त्यांचे वैयक्तिक समीकरण लक्षात घेता पंतप्रधानांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या गुजरात भेटीचे स्मरण केले. या भेटीने भारत जपानच्या संबंधांना नवीन आयाम मिळाला.  महामारीच्या काळात भारत-जपान मैत्री ही जागतिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी आणखी महत्त्वाची बनली आहे या सध्याचे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्या भावनेशी पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. सध्याची आव्हाने अशी मागणी करतात की आमची मैत्री आणि भागीदारी अधिकाधिक दृढ व्हावी, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

मोदी यांनी भारतामध्ये कैझन आणि जपानी कार्य संस्कृतीचा आणखी प्रसार करण्याचे आवाहन केले आणि भारत व  जपानमधील व्यापार विषयक चर्चांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.

मोदींनी जपान आणि जपानच्या लोकांना टोकियो ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्या.