राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत स.भु.प्रशाला औ’बाद चे घवघवीत यश

औरंगाबाद ,२५जून /प्रतिनिधी :- राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या निकाल घोषित  झाला असुन दरवर्षीप्रमाणे यशाची अखंड परंपरा राखत श्री.सरस्वती भुवन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थांमध्ये उजवीकडून यश बुलबुले,वैद्य ऋषिकेश, विश्वजित धांडे, शर्वरी नेरकर यांचा प्रशाले तर्फे गौरव करण्यात आला यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष प्रमोद माने, प्रशालेचे मुख्याध्यापक एम.इ.पाटील, उपमुख्याध्यापक डि.एम. येवले,पर्यवेक्षक एस.एच. परदेशी,मार्गदर्शक शिक्षक डि. व्हि.जोशी,एन.यु.चमचे उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थी व पालकांचे सर्व मान्यवर व शिक्षकवृदांनी अभिनंदन केले.