उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम बनवा-राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद ,२५जून /प्रतिनिधी :-ग्रामीण भागातील महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. ‘उमेद प्रकल्प’च्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि पयार्याने राज्यातील महिला अधिक सक्षम  आणि स्वावलंबी बनतील असे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

Displaying _DSC6131.JPG

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उमेद प्रकल्पाचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषद अध्यक्षा मीनाताई शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, एमएकआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वसेकर, प्रकल्प अधिकारी संगीता पाटील, आदर्श ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे सचिव अनिल घुगे आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री म्हणाले की, उमेदच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी विविध प्रकल्प राबवावे ज्या माध्यमातून महिला अधिक  सक्षम होतील. बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळेचा उपयोग करावा. शनिवारी शाळा संपल्यानंतर आणि रविवार पुर्ण दिवस असा दिड दिवस त्यांना बाजारपेठ उपलब्ध् होईल. तसेच पैठण साडी तयार करण्याच्या प्रशिक्षणासाठी अजिंठा परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्या माध्यमातून र्स्त्रीयांना रोजगार उपलब्ध होईल. आदर्श गा्रमीण्‍ विकास सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून पुढील 3 वर्षांत 5 हजार महिलांना रोजगाराच्या संधी उपलबध करुन देण्यात येतील. जिल्ह्यातील विविध उद्योगांकडून सीएसआर मिळवून त्याचा उपयोग महिलांना उद्योग उभारण्यासाठी करावा असेही राज्यमंत्री म्हणाले.