विद्यार्थ्यांनो, अखेर 11वी प्रवेश परीक्षेचा फॉर्मुला ठरला,प्रवेशासाठी CET परीक्षा घेणार

जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये CET परीक्षा

मुंबई,२४जून /प्रतिनिधी :-अकरावीचे प्रवेश कशापद्धतीने होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम होता. अखेर शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशासाठी होणारी परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत माहिती दिली आहे. 

 राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांनी दहावीचा निकाल जुलै महिन्यात लावण्यात येईल आणि अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या CET परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या ट्विटनुसार इयत्ता दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे. तर अकरावीची दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11 वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

2020-21 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा अर्ज भरलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेलं असल्यानं त्यांना सीईटीसाठी शुल्क भरावे लागणार नाही. पण, सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून निश्चित केलेलं शुल्क भरावे लागणार आहे.

अशी असेल परीक्षा
CET राज्य मंडळाच्या इयत्ता 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर 100 गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसंच OMR पद्धतीने 2 तासांची परीक्षा घेण्यात येईल. यात इंग्रजी,गणित,विज्ञान,सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा offline घेण्यात येईल.

ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसंच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी  माहिती जाहीर करण्यात आली आहे.

CET  म्हणजेच अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जुनिअर कॉलेजमध्ये (Junior College) प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासठी ही परीक्षा असणार आहे.

ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.

एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यात  इंग्रजी, गणित, विज्ञान आणि  सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असणार आहेत.

प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे.

परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे.