औरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 1लाख 41हजार 370 कोरोनामुक्त, 892 रुग्णांवर उपचार सुरू 

औरंगाबाद, ​२३ जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 103 जणांना (मनपा 14, ग्रामीण 89) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 1 लाख 41 हजार 370 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 666 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3 हजार 404 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 892 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 
 मनपा (08) घाटी परिसर 2, शहानूरवाडी 1, शिवाजी नगर 1, बीड बायपास 1, शहाबाजार 1, सातारा परिसर 1, धावणी मोहल्ला 1
 ग्रामीण (51) पोरगाव ता.पैठण 1, मुंडवाडी ता.कन्नड 2, ताजनापूर, ता.खुल्ताबाद 1, अन्य 47
 मृत्यू (05)  

घाटी (03) 1. पुरूष/40/बाबरा, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.2. पुरूष/70/सोनारी, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.3. पुरूष/69/राहतगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
 खाजगी रुग्णालय (2) 1. पुरूष/54/वेदांत नगर, रेल्वे स्टेशन, औरंगाबाद.2. पुरूष/60/चापानेर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.