औरंगाबाद जिल्ह्यात 54 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 141146 कोरोनामुक्त, 993 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२१जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 74 जणांना (मनपा 19, ग्रामीण 55) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 141146 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 54 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 145530 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3391 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 993 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (20) मुकुंदवाडी 1, कांचनवाडी 3, जाधववाडी 1, दिशा नगरी 1, बीड बायपास 2, स्वामी समर्थ केंद्र 1, ब्रिजवाडी 1, चिकलठाणा 1, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पीटल 1, एन-1 येथे 1, अन्य 07

ग्रामीण (34)बजाज नगर 1, माहोरा ता.कन्नड 1, भीमशक्ती नगर सातारा गाव 1, रांजणगाव शेणपूंजी 1, गंगापूर 1, अन्य 29

मृत्यू (04)

घाटी (03) 1. पुरूष/64/खुलताबाद, जि.औरंगाबाद.2. पुरूष/80/मुंडवाडी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.3. स्त्री/77/सिडको, एन-6, बजरंग चौक, औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (01) 1. पुरूष/57/काबिल औषधी केंद्राजवळ, शहाबाजार, औरंगाबाद.