एमजीएम विद्यापीठात सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद,२१जून /प्रतिनिधी :- केवळ आजारांवर मात करण्यासाठी नव्हे तर मानसिक आणि शारिरीक संतुलन ठेवण्यासाठी ‘योग’ हा फार महत्त्वाची भूमिका साकारतो. त्याचमुळे भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्व मिळाले आहे.  याच पार्श्वभूमीवर आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त एमजीएम विद्यापीठाअंतर्गत एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स योग सायन्स अँड फिजिकल एज्युकेशन विभागातर्फे सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन व ऑफलाईन सकाळी सात ते आठ या वेळेमध्ये साजरा करण्यात आला.

यावेळी एमजीएम योग विभागाचे योगगुरू गंगाप्रसादजी खरात यांनी सर्वप्रथम योगाचे महत्त्व विशद करून विविध प्रकारची योगासने, प्राणायाम आणि ध्यान करून  घेतले.

याप्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम , अनुराधाताई कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, उपकुलसचिव प्रेरणा दळवी, जर्नालिझम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके,   क्रीडा विभागाचे डॉ. दिनेश वंजारे, अनिरुद्ध जोशी, जॉय थॉमस, तसेच एमजीएम फिजिओथेरपी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑनलाईन पद्धतीने  एमजीएम विभागाचे सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमजीएम क्रीडा विभाग, एमजीएम जर्नलिझम, एमजीएमफिजिओथेरपी महाविद्यालयातील शिक्षक आदी प्रयत्नशील होते. हा कार्यक्रम कोविड-१९ या साथ  रोगाच्या नियमाचे पालन करून घेण्यात आला.