निरोगी जीवनासाठी योग,सातवा योग दिवस साजरा करूया

PM Narendra Modi's message on International Yoga Day

नवी दिल्ली,२०जून /प्रतिनिधी :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करतील. ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले ,”उद्या 21 जून रोजी आपण सातवा योग दिवस साजरा करूया. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासनावर भर देण्याच्या दृष्टीने ‘निरोगी जीवनासाठी योग’  ही यावर्षीची संकल्पना आहे. उद्या सकाळी 6:30 वाजता योग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे.”

महाराष्ट्रात 4 ठिकाणी योग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार

केंद्रीय संस्कृती मंत्रालय, दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असून यावर्षी ‘योग-एक भारतीय वारसा या अभियानांतर्गत हा आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात येत आहे.   

योग दिवस देशातील 75 सांस्कृतिक ठिकाणी साजरा केला जाईल आणि 45 मिनिटे योगाभ्यास त्यानंतर 30 मिनिटांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात येतील. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील चार स्थळे निवडली गेली आहेत. आगा खान पॅलेस -पुणे, कान्हेरी लेणी-मुंबई, वेरूळ लेणी-औरंगाबाद आणि जुने उच्च न्यायालय इमारत- नागपूर,ही ती चार स्थळे आहेत.केंद्राने संरक्षित केलेली राष्ट्रीय महत्त्वाची अशी ही चार स्मारके आहेत.

आगा खान पॅलेस- पुणे आणि कान्हेरी लेणी- मुंबई ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई विभागाअंतर्गत(मुंबई सर्कल) येतात, वेरूळ लेणी-औरंगाबाद, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या, औरंगाबाद विभागात(औरंगाबाद सर्कल) तर , जुनी उच्च न्यायालय इमारत- नागपूर हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नागपूर विभागाअंतर्गत(नागपूर सर्कल) येतात.

 मुंबई सर्कल आणि औरंगाबाद सर्कल यांच्या द्वारे , कान्हेरी लेणी-मुंबई येथे आणि औरंगाबाद सर्कल -वेरूळ लेणी येथे अनुक्रमे , योग प्रशिक्षक सकाळी 7 ते सकाळी 7.30 या दरम्यान योग साधना सादर करतील आणि त्यानंतर संगीत नाटक अकादमीद्वारे सकाळी 8.15 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील.