औरंगाबाद विमानतळ: विस्तारीकरणासाठी 182 हेक्टर जमिन प्रस्तावित,भूसंपादनाची प्रक्रियेसाठी मोजणी सुरू

जिल्हाधिकारी यांनी केली विमानतळ विस्तारीकरणाच्या जागेची पाहणी

Displaying 1.jpg

औरंगाबाद,१८जून /प्रतिनिधी :-आगामी काळात औरंगाबाद शहराचा विकासाचा वेग लक्षात घेता औद्योगिक विकासाला साह्यभूत ठरणाऱ्या औरंगाबाद विमानतळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्याचे प्रस्तावित असल्याने विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित असलेल्या चिकलठाणा, मूर्तिजापूर, मुकुंदवाडी या ठिकाणी मोजणी झालेल्या जागांची पाहणी आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण  यांनी  केली.

यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रिता मैत्रेवार, औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डी.जी.साळवे, सहायक महाप्रबंधक सुधीर जगदाळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, नगर भूमापन अधिकारी जी.आर.सोनार, विमानतळ प्राधिकरणाचे कनिष्ठ तांत्रिक अभियंता अमित सिंग, रितेश रमन तसेच मोजणीदार संतोष मस्के  व संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Displaying 5.jpg

औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 182 हेक्टर जमिन प्रस्तावित असून याचे भूसंपादनाची प्रक्रियेसाठी मोजणी व सर्वेक्षण सुरू असून भारतीय विमान प्राधिकरणाच्या औरंगाबाद कार्यकक्षेतील जमिनीवरील अतिक्रमणाबाबतही जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी आढावा घेतला. गावठाण व शहर हद्दीत असलेल्या जमिनीच्या संपादनाबाबत भूसंपादन अधिकारी तसेच सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांना यावेळी निर्देशित केले. त्याचप्रमाणे प्रकाश नगर, मूर्तीजापूर, कामगार कॉलनी, चिकलठाणा, येथील रहिवासी नागरिकांशी संवाद साधत त्यांना घराच्या सुविधेबाबतही जिल्हाधिकारी यांनी आश्वासित केले. विमानतळ विस्तारीकरणात आवश्यक असलेल्या व मोजणी झालेल्या जमिनीवर योग्य ते मार्किंग करुन खांब अथवा खूणा दिसतील अशा रंगात आणि सदरील जमिन विमानतळ प्राधिकरणाची आहे अशा संदेशाचा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Displaying 4.jpg

या भेटीदरम्यान विमानतळ प्राधिकरणाचे श्री.साळवे यांनी औरंगाबाद शहरातील विमानतळ तयार झाल्यापासून यामध्ये झालेले बदल व पार्श्वभूमी या विषयी माहिती दिली. तसेच तांत्रिक पथकाने विमानतळाच्या नकाशाप्रमाणे कोणकोणत्या बाबी प्रस्तावित आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.