औरंगाबादेत करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या १५०,आतापर्यंत २७५६ बाधित

औरंगाबाद

शहर परिसरातील गेल्या २४ तासांमध्ये सात करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या १५० झाली आहे, तर रविवारी (१४ जून) दिवसरात १३० नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या २७५६ वर पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे आतापर्यंत १५०२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत आणि सध्या ११०४ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बारी कॉलनी येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला दोन जून रोजी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. संबंधित रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते व त्याला पूर्वीपासून उच्चरक्तदाब व मधुमेह होता. उपचारादरम्यान न्युमोनिया, सेप्टिक शॉक, मूत्रपिंडविकार आदींमुळे रुग्णाचा रविवारी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी मृत्यू झाला. जहांगीर कॉलनी (हर्सूल) येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाला १२ जून रोजी रुग्णालयात दाखल केले होते व रुग्ण करोनाबाधित असल्याचे चाचणीवरुन स्पष्ट झाले होते. याच रुग्णाला पूर्वीपासून उच्चरक्तदाब, मधुमेह व मूत्रपिंडविकार व फुफ्फुसाचा आजार होता आणि रुग्ण दाखल झाल्यापासून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान न्युमोनिया, सेप्टिक शॉक आदींच्या गुंतागुंतीतून रुग्णाचा रविवारी सकाळी साडेदहाला मृत्यू झाला. त्याचवेळी बारी कॉलनीतील ६२ वर्षीय करोनाबाधित महिला रुग्णाचा शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता मृत्युही त्याच खासगी रुग्णालयात झाला. त्याशिवाय दुसऱया एका खासगी रुग्णालयात सिडकोतील एन-सहामधील साई नगरातील ५८ वर्षीय करोनाबाधित पुरूष रुग्णाचाही व शहरातील आणखी एका खासगी रुग्णालयात रेल्वे स्टेशन परिसरातील सिल्कमिल कॉलनीतील ५२ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्येही (घाटी) दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये मयुर नगर (हडको) येथील ७१ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचा शनिवारी (१३ जून) सकाळी साडेअकराला, तर रेहमानिया कॉलनी येथील ५० वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचा शनिवारी सायंकाळी सात वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत १११, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ३८, जिल्हा सामान्य रुग्णावलयात एका बाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १५० करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

८६ पुरुष, ४४ महिला बाधित

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १३० बाधितांमध्ये राजाबाजार येथील १, न्यू हनुमान नगर २, बायजीपुरा १, खोकडपुरा २, बांबट नगर, बीड बायपास २, साई नगर, एन-सहा २, राजमाता हाऊसिंग सोसायटी १, माया नगर, एन-दोन ३, संजय नगर, आकाशवाणी परिसर १, रशीदपुरा २, यशोधरा कॉलनी २, सिडको पोलिस स्टेशन परिसर १, सिल्कमिल कॉलनी १, किराडपुरा १, पीरबाजार २, शहानूरवाडी २, गजानन मंदिर परिसर, गारखेडा २, अहिल्या नगर, मुकुंदवाडी १, जहाँगीर कॉलनी, हर्सूल १, कैलास नगर २, समर्थनगर १, छावणी परिसर ४, गौतम नगर १, गुलमंडी ५, भाग्यनगर १, गजानन नगर, गल्ली नं-नऊ ४, मंजूरपुरा १, मदनी चौक १, रांजणगाव १, बेगमपुरा १, रेहमानिया कॉलनी २, काली मस्जिद परिसर १, क्रांतीचौक परिसर १, विश्रांती नगर १, कन्नड ५, जिल्हा परिषद परिसर ४, देवगिरी नगर, सिडको वाळूज १, बजाज नगर १५, रामनगर १, देवगिरी कॉलनी सिडको ४, वडगाव कोल्हाटी २, स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी १, नक्षत्रवाडी २, बकलवाल नगर, वाळूज २, सलामपूर, पंढरपूर ११, वलदगाव १, साई समृद्धी नगर, कमलापूर २, अज्वानगर १, फुले नगर, पंढरपूर ४, गणेश नगर, पंढरपूर १, वाळूजगाव (ता. गंगापूर) १, शाहू नगर, सिल्लोड १, मुस्तफा पार्क, वैजापूर १, एन-नऊ, शिवाजीनगर, सिडको १, सहकार नगर, न्यू उस्मानपुरा १, एन-दोन, सिडको, मुकुंदवाडी १, कटकट गेट २, दुधड १, अबरार कॉलनी १ अजबनगर १, कोहिनूर कॉलनी १, त्रिमूर्ती चौक १, इतर ठिकाणचे २, या भागातील ८६ पुरूष व ४४ महिलांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.