वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना शुभेच्छा

मुंबई,१७जून /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले. 

यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

Image
Image

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन राज्यपालांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.