परभणीत व्यापार्‍यांना परवाने बंधनकारक;आयुक्तांनी काढले आदेश

परभणी, १७जून/प्रतिनिधी:- परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीने परभणी हद्दीतील सर्व लहान, मध्यम व मोठे व्यवसाय धारकांना व्यवसाय परवाना दिल्या जाणार आहे.
प्रभाग समिती अ, ब, क अंतर्गत शहरातील व्यवसायधारकांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे प्रकरण 22 लायसन परवाने कलम 330, 331, 315, 337 ते 378, 379,381 ते 387 कलमान्वये व्यवसायधारकांना परवाना देणे अनिवार्य आहे व ते त्यांना देणे कामी त्यावर लायसन/परवाना शुल्क आकारून सदर परवाना तीन वर्षाकरीता, एक वर्षासाठी वितरीत करण्यात येणार आहे. शहरातील सोने-चांदी दागिणे कारागिर, सर्व प्रकारचे भांडी विक्रेते, होम अप्लायसेन्स, जनरल स्टोअर्स, बुक सेंटर, पेन, स्टेशनरी, कॉकरी, लेडीज एम्पोरिअम, ऑप्टीकल्स, कॉस्मेटीक, खेळणी, बॅग, सुटकेस, लॉटरी सेंटर, धार्मिक पूजा साहित्य विक्रेता, कटींग सलून, ब्युटी पार्लर, भंगार दुकाने, गादी घर, शेती औजारे, बियाणे, फर्टिलायझर्स, किटकनाशक औषधी कृषि केंद्र, तट्टे बांबू विक्रेते, सर्वप्रकारचे रेडीमेड, हॅन्डलूम, होजिअरी, गारमेंट, टेलरिंग, कापड व्यापारी, सर्व क्लिनीक, दवाखाने, फिरते हातगाडेवाले विक्रेते, सर्व मोटार मेकॅनिक, गॅरेज, सर्व्हीस सेंटर, जुन्या गाड्या खरेदी-विक्री, ऍटोमोबाईल्स, मोटार ऑईल, झेरॉक्स, डिटीपी जॉबवर्क, टाईपिंग वर्क, कर सल्लागार, आर्किटेक, वास्तू कला शिल्प, चार्टट अकाऊंटट, सर्व प्रकारचे मशिनरी विक्रेते, फोटो स्टुडिओ, रक्तपेढी, सोनोग्राफी सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल्स, संगणक विक्रेते, रिचार्ज सेंटर, वजन काटे, खाजगी कोचिंग क्लासेस, शिकवणी, टायपिंग इन्स्टिट्यूट, संगणक प्रशिक्षण केंद्र, हार्डवेअर, मंगल कार्यालये, फंक्शन हॉल, चित्रपट गृह, नाट्यगृह, मोबाईल टॉवर, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, गॅस एजन्सीधारक, चहा, पानटपरी, रस्त्यावरील हातगाडेवाले, कत्तलखाने, मटन, चिकन,अंडे,मासे विक्रेते, किराणा दुकान, मिठाई घर, खानावळ, भोजनालय, रसवंती गृह आदी सर्व विक्रेत्यांना परवाना बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्वांनी मनपातील प्रभाग समिती अ,ब,क अंतर्गत जाऊन नोंदणी प्रमाणपत्र घ्यावेत असे आदेश आयुक्त देविदास पवार, उपायुक्त प्रदीप जगताप यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. याची अंमलबजावणी तत्काळ करण्याचेही सुचित करण्यात आले आहे. मनपा सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 169 नुसार सदरील कारवाई करण्यात येत आहे.