औरंगाबाद जिल्ह्यात 100 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 140366 कोरोनामुक्त,1281रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,१६जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 252 जणांना (मनपा 19, ग्रामीण 233) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 140366 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 100 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 145008 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3361 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1281 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा (20) नाईक नगर बीड बायपास 2, जुना बाजार 1, नारेगाव 1,मयुर पार्क 1, अशोक नगर 1, विशाल नगर 1, मथुरा नगर 1, स्नेह नगर 1, नेहरू नगर 1, एकता नगर 1, काचंनवाडी 1, अन्य 8 

ग्रामीण (80) सावखेडा ता.सोयगाव 1,रिधोरा देवी ता.फुलंब्री 1, पाथ्री ता. फुलंब्री 3, एकता नगर रांजणगाव 1, सारा गौरव वडगाव 2, गेवराई ता.औरंगाबाद 1, अन्य 71 

कोरोनाबाधितांचा मृत्यू (05)

घाटी (03) 1. 60, पुरुष,पडेगाव 2. 72, स्त्री, सिल्लोड3. 65, स्त्री, जायकवाडी ता.पैठण 

खासगी रुग्णालय (02) 1. 46, पुरुष,शिवाजी हायस्कुल 2. 55, पुरुष, हाऊसिंग सोसायटी औरंगाबाद