उमरगा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे काम वेगाने करण्याचे आदेश

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट

उमरगा ,१६जून /नारायण गोस्वामी
येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटला आज उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट दिली. प्रगती पथावर असलेल्या या प्रक्ल्पाबद्दल संबंधित अधिकारी वर्गाला सूचना करीत काम वेगाने करण्याचे  आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले ,तहसीलदार संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक बडे साहेब ,डॉक्टर मुल्ला ,डॉक्टर जगताप ,बांधकाम विभागाचे विभूते, सह कर्मचारी उपस्थित होते . यावेळी जिल्हाधिकारी यांनी ,हा प्रकल्प किती महत्वाचा असून ,हा प्रकल्प त्वरित कार्यान्वित  करण्यासाठी वेगाने काम करण्याची गरज असल्याचे म्हटले . यावेळी  दिवेगावकर यांनी महसूल व बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गास सूचना केल्या . 

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्याकडून परिचारिकांचे कौतुक 

यावेळी  उपस्थित असणाऱ्या परिचारिकाचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.परिचारिकानी व स्टाफ ने कोविड काळात उत्तम सेवा करून प्रामाणिक कर्तव्य बजावले. त्याबद्दल उपस्थित परिचारिकांचे त्यांनी अभिनंदन केले व काही समस्या आहेत का? अशी आस्थेने विचारपूस केली . यावेळी आरोग्य कर्मचारी यांचे सरकारी निवासस्थानी अनेक  अडचणी असून ,त्यांची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी परिचारिकांनी  केली . यावर जिल्हाधिकारी यांनी हजर असलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंताना सदर निवासस्थानी दुरुस्ती व इतर कामे करण्याचे  आदेश दिले .