राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांखाली,राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला

मुंबई ,१५ जून /प्रतिनिधी:-  गेल्या काही महिन्यांमध्ये रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांची संख्या ५०-६० हजारांवरून १० हजारांपर्यंत खाली आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घसरण  होत आहे आणि कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आज दैनंदिन रुग्णसंख्या ही 10 हजारांखाली आली आहे. आज राज्यात 9350 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.मंगळवारी दिवसभरात राज्यात झालेल्या करोना मृत्यूंची संख्या थेट ३८८ च्या घरात गेली आहे. सोमवारी हाच आकडा २०० इतका नोंदवण्यात आला होता. मात्र मृतकांचा आकडा चिंता वाढवणारा आहे.

Image

आज राज्यात 15176 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 56,69,179 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट हा 95.69 टक्के इतका झाला आहे. ही एक निश्चितच दिलासादायक बाब महाराष्ट्रासाठी आहे.

राज्यात आज एकूण 388 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.93 टक्के इतका झाला आहे. मृत्यू दर हा 2 टक्क्यांच्या जवळ पोहोचल्याने चिंता वाढली आहे. आज राज्यात नोंद झालेल्या 388 मृत्युंपैकी 275 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 113 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

गेल्या २४ तासांत राज्यात ३८८ करोना मृत्यूंची नोंद करण्यात आली असून एकूण करोना मृतांचा आकडा आता १ लाख १४ हजार १५४ इतका झाला आहे. त्याचवेळी राज्यात ९ हजार ३५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात करोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ५९ लाख २४ हजार ७७३ इतका झाला आहे. त्यापैकी सध्या राज्यात १ लाख ३८ हजार ३६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज राज्यात करोनावर मात करून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा १५ हजार १७६ इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत करोनावर मात केलेल्या राज्यातल्या रुग्णांची संख्या ५६ लाख ६९ हजार १७९ इतकी नोंदवण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

भारतात सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 9,73,158

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या 66 दिवसांनंतर 10 लाखांपेक्षा कमी

भारतात गेल्या 24 तासात 70,421 नव्या रुग्णांची नोंद; 74 दिवसांतील नीचांक

देशात आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 2,81,62,947

गेल्या 24 तासात बरे झालेल्यांची संख्या 1,19,501

सलग 32 व्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या दैनंदिन रुग्णांपेक्षा जास्त

बरे होण्याचा दर वाढून 95.43%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% हून कमी; सध्या हा दर 4.54%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.72%; सलग 21 व्या दिवशी हा दर 10 टक्क्यांपेक्षा कमी

देशात चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ कायम असून  आतापर्यंत देशात एकूण 37.96 कोटींपेक्षा अधिक  चाचण्या करण्यात आल्या

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत 25.48 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.