औरंगाबाद जिल्ह्यात 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 140114 कोरोनामुक्त, 1438 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,१५ जून /प्रतिनिधी:- 

औरंगाबाद जिल्ह्यात आज 268 जणांना (मनपा 21, ग्रामीण 247) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 140114 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144908 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3356 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1438 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.   

मनपा (20) बीड बायपास 2, शांतीपूरा 1, सईदा कॉलनी एनएस पार्क 1, गुरूदत्त नगर 1, एन-7 पोलीस कॉलनी 2, सुरेवाडी हर्सूल 1, हिरापूर केंब्रीज शाळेजवळ 1, एन-3 सिडको 1, कैलास नगर जालना रोड 1, एटीपीओ बेंडवाडी 1, चिकलठाणा 1, महाराणा प्रताप स्कुल 1, जय भवानी नगर 1, अन्य 5  

ग्रामीण (100) फुलंब्री 1, कचनेर जिल्हा परिषदे शाळेजवळ 1, सावता नगर कमलापूर 1, रामराई रोड वाळूज 1, देऊळगाव बाजार 1, अन्य 95  

मृत्यू (07) 

घाटी (03)1.स्त्री/55/दावलपूरी, जि.औरंगाबाद. 2.स्त्री/70/फुलंब्री, जि.औरंगाबाद.3.पुरूष/85/विरामगाव, ता.खुल्ताबाद, जि.औरंगाबाद  

जिल्हा सामान्य रुग्णालय (01) 1.पुरूष/60/ विहामांडवा
खासगी रुग्णालय (3) 1. पुरूष/66/ सुदर्शन नगर, औरंगाबाद2.पुरूष/66/ हनुमान नगर, औरंगाबाद3.पुरुष/50/ ढोरकीन